विविध शैक्षणिक कामांचे ओझे शिक्षकांवर न टाकता शिक्षकांना शिकवू द्या-शिक्षक भारती

0 0
Read Time4 Minute, 3 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

संपादक गफ्फार मलिक(शेख)

चाळीसगांव(प्रतिनिधी)-मंत्रिमंडळात झालेल्या चर्चेनुसार शिक्षण आयुक्त पुणे यांनी २४ऑगस्ट २०२२ रोजी राज्यातील शिक्षणाधिकारी व शिक्षण निरीक्षक यांना विसीद्वारे ए फोर साईज पेपरवर शिक्षकांचे वर्गात फोटो लावण्याचे आदेश दिलेले आहेत.तसेच पावसाळी अधिवेशनादरम्यान आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांबद्दल अपमानजनक वक्तव्य केले आहे.या दोन्ही घटना समाज व्यवस्थेतील शिक्षकांच्या सन्मानाला धक्का देणाऱ्या आहेत. शासन पातळीवर जाणीवपूर्वक शिक्षकांना बदनाम करून अनुदानित शिक्षण व्यवस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.राज्यभरातील शिक्षक समन्वय समितीच्या माध्यमातून आम्हाला शिकवू द्या अभियान चालवून शिक्षकांना वर्गात शिकवू देण्याची मागणी करत आहेत. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी आणि शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्राला पुन्हा नंबर एक वर आणण्यासाठी ठोस कृती कार्यक्रम देण्याची गरज असताना शिक्षण विभाग शिक्षकांचे मानसिक खच्चीकरण करत आहे. विविध शैक्षणिक कामांचे ओझे शिक्षकांवर लादून शिक्षकाचा वेळ वर्गात शिकवण्यापेक्षा इतर कामांमध्ये कसा जाईल, त्याचा परिणाम म्हणून शैक्षणिक दर्जा राखण्यात शिक्षकांना अपयशी कसे ठरवले जाईल आणि अखेर त्याचे खापर शिक्षकांच्या माथ्यावर फोडून अनुदानित शिक्षण व्यवस्था बंद करण्याचा घाट शासनाने सुरू केला आहे.शिक्षक भारती याचा तीव्र निषेध करते,असे निवेदनात म्हटले आहे,हे निवेदन चाळीसगाव येथील गटशिक्षणाधिकारी श्री.विलास भोई यांना देण्यात आले,शिक्षण विस्तार अधिकारी श्री.जितेंद्र महाजन व श्री.आबासाहेब पगारे तसेच शिक्षक भारतीचे चाळीसगाव तालुकाध्यक्ष
श्री.अजिज खाटीक,तालुका उपाध्यक्ष मुख्याध्यापक श्री.सोपानराव निकम,तालुका कार्यवाह प्राचार्य श्री.अभिजित खलाणे,तालुका कार्याध्यक्ष श्री.निलेश पाटील,तालुका महिला आघाडी प्रमुख श्रीमती वैशाली अहिरराव,श्रीमती पुष्पलता शर्मा,सौ.कामिनी पाटील,श्री.योगेश पाटील, मुख्याध्यापक श्री.रमेश सोनवणे,श्री.डाॅ.प्रा.मनोज शितोळे,श्री.कुणाल पाटील व शिक्षक भारतीचे पदाधिकारी व शिक्षक बंधू-भगिनी कार्यकर्ते उपस्थित होते.वर्गात शिक्षकांचा फोटो लावणे व आमदार श्री.प्रशांत बंब यांच्या शिक्षकांविषयीच्या अपमानजनक वक्तव्याचा जाहिर निषेध काळ्या फिती लावून करण्यात आला,सदरिल निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांना इमेलद्वारे पाठविण्यात आल्या आहेत.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.