अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी सनी घावरी(चिंचवड)
यु ट्यूब वरती सध्या अनेक मराठी वेब सिरीज चा बोलबाला सुरू आहे. त्यात अजून एका नव्या कोऱ्या मराठी वेब सिरीजची भर पडत आहे. ती म्हणजे “वॉशिंग सेंटर” एन जी एस इंटरटेनमेंट प्रस्तुत वॉशिंग सेंटर ही मराठी वेब सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आज दि. 5/7/2020 रोजी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून या वेब सिरीज चाा पोस्टर सोशल मीडियावर ती नुकताच प्रदर्शित केला गेला.
पोस्ट वरती दाखवलेली व्यक्ती ही देवीची पूजा करताना दिसून येत आहे. मात्र सेंटर या शब्दातील “र” हे अक्षर रक्ताच्या ठिपक्यांत दाखवल्याने वेब सिरीज कोणत्या आशियाला धरून आहे याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे.
या वेब सिरीज चे कार्यकारी निर्माता अजय साठे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “पिंपरी-चिंचवड शहरातील ही वेबसिरीज आहे. लवकरच या वेब सिरीज चा टिझर आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहोत. टिझर मधून अनेक गोष्टी प्रेक्षकांच्या समोर येतील.” ही वेबसेरीज महाराष्ट्राच्या असंख्य जनतेला अक्षरशः वेड लावणार हे मात्र नक्की आहे