पुणे(दि 26):-जिल्हा परिषद पुणे, समाज कल्याण विभागाच्या (कोरोनाच्या व लॉकडाऊन पार्शभूमीवर)वतीने राबविण्यात येणारी शरद भोजन योजनेचे फॉर्म विकास कदम पंचायत समिती यांच्या गणातील लिंगाळी,गोपाळवाडी ग्रामपंचायत हद्दीत जे परप्रांतीय व परगावातील नागरिक अनेक दिवसापासून/ वर्षापासून वास्तव्यास आहेत परंतु ज्या कुटुंबांचे रेशन कार्ड नाही अश्या गरजू व्यक्तींना या योजनेचा(गहु/तांदुळ) लाभ घेता यावा यासाठी समक्ष लाभार्थी राहत असलेल्या जागी जाऊन,,पोस्ट बॅक खाते काढणेसाठी पोस्टमन,ग्रामसेवक,लिपीक व विकास कदम पंचायत सदस्य यांनी स्वतः गेल्या दोन दिवसांपासून स.१० ते सांय ७ पर्यत लिंगाळी ग्रा.प मधील ३०कुटुंबाचे फॉर्म भरले व गोपाळवाडी ग्रा.प मधील ३१ कुटुंबाचे फॉर्म भरले,याकामासाठी गट विकास अधिकारी गणेश मोरे याच्या मार्गदर्शनाखाली लिंगाळी ग्रामसेवक मच्छिद्र निगडे,लिपीक सतिश चिकणे,संदिप येडे गोपाळवाडी ग्रामसेविका स्वाती लामकाने,लिपीक ठकसेन सुळ,कलपेश लांडगे व दौंड तलाठी हारीचंद्र फंरादे,पोस्टमास्तर आकाश थोरात,पोस्टमास्तर अनुसया लोंढे व फोटोग्राफर सञ्जन काकडे या सर्वाचे सहकार्य लाभले विकास कदम पंचायत सदस्य यांनी सर्वांचे आभार मानले,व जि प ने लवकरात लवकर हा लाभ लाभार्थीना दयावा हि विंनती. विकास कदम:-सदस्य पंचायत समिती,दौंड यांनी केली.
Read Time2 Minute, 12 Second