अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी गफ्फार शाह
चाळीसगाव(प्रतिनिधी)-बँक ऑफ बडोदा स्टेशन रोड मुख्य रस्त्यावर असलेले भले मोठे खड्डे स्थानिक प्रशासनाच्या लक्षात नाही की दुर्लक्ष केले जात आहे,
नगरपालिका प्रशासनास अपघात होऊ नये म्हणून उपाययोजना म्हणून बॅरिकेट्स लावण्यासाठी सुद्धा वेळ नाही.शहरातील स्टेशन रोड बँक ऑफ बडोदा समोरील गटारीचा स्लॅब कोसळून भले मोठे खड्डे झाले असून स्थानिक प्रशासन अपघाताची वाट पाहत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
वारंवार ह्या खड्ड्याची दुरुस्ती केली झाले मात्र नेहमी काम केल्यावर परिस्थिती जैसे थी होत असते यावर कायम स्वरूपी तोडगा निघणे आवश्यक असून स्टेशन रोड हा शहरातील मुख्य रस्ता आहे या रस्त्यावर दिवसभर वाहनांची वर्दळ सुरू असते आजू बाजूच्या गावातील असो की शहरातील नागरीक असो हा रस्ता मुख्य बाजरपेठेंकडे जातो या मुळे या रस्त्याचा वापर दिवसभर सुरू असतो मात्र या रस्त्यावर बँक ऑफ बडोदा जवळ समोरच एक भला मोठा खड्डा झाला असून खड्ड्याच्या आजू बाजूला लोकांचा अपघात होऊ नये म्हणून संरक्षक साठी बॅरिकेट लावले नसल्याने अपघात होऊ शकतो, खड्डा मोठा असल्याने अपघातात जीवित हानी झाल्यास जबाबदार कोण?गटारीचा स्लॅब कोसळून खड्डा झाल्याची नगरपालिका प्रशासनास माहिती नाही का?की अपघात झाल्यावर उपयोजना म्हणून बॅरिकेट्स लावण्यात येथील नगरपालिका प्रशासन अपघात होण्याची वाट पाहत आहे का? असे अनेक प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले आहे तसेच अपघात पूर्वी नगरपालिका प्रशासनाने काम होईल तेव्हा होईल मात्र आता बॅरिकेट्स तरी लावावे व अपघात होण्या पासून टाळावे अशी मागणी देखील नागरिकांनी केली आहे नगरपालिका प्रशासन नेमकी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.