अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी):-खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड तालुक्यातील दिनांक 17 जून 2021 गुरुवारी ऱोजी आढावा बैठक पार पडली ,बैठकीत दौंड शहरातील अनेक समस्या मांडण्यात आल्या, तसेच लोकशाहीर आण्णाभाऊ साठे गार्डन दुरावस्था ,त्याच्या लगत नॅशनल हायवे रस्त्याचे रुंदीकरण डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथील रस्त्याच्या रखडलेले काम काज पाहणी करत असताना कोरोणाच्या महामारी च्या संकटात शासन,प्रशासन ,पोलीस प्रशासन व सामाजिक संस्था ,संघटना यांनी केलेल्या कार्याचे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी कौतुक केले, तसेच तिसरा मोरीचे कामकाज इन अपूर्ण असले तरी, डिसेंबर महीन्यात काम पूर्ण करू असे रेल्वे कॉन्टॅक्टर यांनी खा. सुप्रियाताई सुळे यांना आश्वासन दिले असता दौंडच्या नागरिकांना आता दिलासा मिळाला असून लवकरच तिसर्या मोरीचे काम पूर्ण होणार.
यावेळी खा. सुप्रिया ताई सुळे .मा.आ.रमेश आप्पा थोरात, वैशालीताई नागवडे, विरधवल(बाबा) जगदाळे, उपविभागीय प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, नारायण पवार (पो.नि.)पाटील साहेब (पो.नि.) संग्राम डांगे वैद्यकीय अधिकारी तसेच पक्षातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.