शाळेत गळते पावसाळ्याचे पाणी शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची कसरत,ना पा प्रशासनास जागे करण्यासाठी रयत सेनेचे निवेदन

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक(शेख)
चाळीसगाव प्रतिनिधी – शहरातील नगरपालिका ची शाळा क्र १ च्या छताचे कौल जीर्ण झाले असून पावसाळ्यात विद्यार्थ्यांना शाळेत बसणे मुश्किल झाले आहेत शिवाय शाळेत इतर सुविधांचा अभाव आहे या सर्व सुविधा शाळेला द्याव्यात अशी मागणी रयत सेनेच्या वतीने निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांच्याकडे दि २४ रोजी करण्यात आली असून मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की नगरपरिषद शाळा क्रमांक १ या शाळेच्या छतावर असलेले कौल जीर्ण झालेले आहे काही कौल फुटलेले आहेत ते बदलून पत्रे बसविण्यात यावेत जेणेकरून गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सुलभ होईल ,मराठी शाळेत पटसंख्या ७१ असून पाऊसळ्यात वर्ग खोल्या गळत असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत बसणे मुश्किल झाले आहे. सध्या इग्लिश मेडीयम चे युग असल्यामुळे मराठी शाळा बंद पडत आहेत. नगरपरिषद शाळा वाचवण्यासाठी मुख्याधिकारी यांनी प्रयत्न करावे तसेच पिण्याचे व वापरण्याचे पाण्याचे नळ व टाकीचे सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी तसेच मुले मुलींकरता शौचालय बांधून देण्यात यावेत या सर्व वरील मागण्या न्यायिक असून चाळीसगाव नगरपरिषदेच्या वतीने शाळेला सुविधा पुरविण्यात याव्यात अशी मागणी न पा मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांच्याकडे केली आहे असे न झाल्यास रयत सेनेच्या वतीने नगरपरिषद कार्यालय परीसरात तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे निवेदनाच्या प्रती खासदार सो जळगाव, आमदार सो चाळीसगाव यांना देण्यात आल्या असून निवेदनावर रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आबासाहेब गरुड, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष गोकुळ पाटील ,जिल्हा अध्यक्ष संजय कापसे ,जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड, तालुका उपाध्यक्ष विलास मराठे, रमेश पाटील, शहर संघटक दीपक देशमुख ,गणेश देशमुख, निलेश वाघ, रोहित महाजन, गणेश पाटील यांच्या सह्या आहेत.