Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

शिक्षकांसाठी ‘टीचर इनोव्हेशन अवार्ड’

0
0 0
Read Time7 Minute, 3 Second

अधिकार आमचा न्युज नेटवर्क

राष्ट्रीयस्तर नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन.सर्व शिक्षकांना अभिनव संधी
सर फाउंडेशन जळगाव जिल्हा समन्वयक किशोर पाटील कुंझरकर यांचे सहभागाचे आवाहन.

दि ३० : स्टेट इनोव्हेशन अँण्ड रिसर्च फाउंडेशन महाराष्ट्र (सर फाउंडेशन) तर्फे शिक्षकांसाठी ‘टीचर इनोव्हेशन अवार्ड’ या पुरस्कारासाठी राष्ट्रीय स्तर नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सर फाऊंडेशन गेल्या चौदा वर्षापासून ‘इनोव्हेशन’ या विषयावर कार्य करीत आहे. आय. आय. एम. अहमदाबाद व महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभाग यांच्यासोबत झालेल्या सामंजस्य करारानुसार ‘एज्युकेशन इनोव्हेशन बँक’ या प्रकल्पांतर्गत या संस्थेने हे कार्य सुरू केले आहे. अशी माहिती सर फाउंडेशन चे जळगाव जिल्हा समन्वयक राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांनी दिली. पुढे बोलताना ते म्हणाले की,
राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यातील प्रत्येक शाळा झपाट्याने प्रगत होत आहे. शाळेतील शिक्षण प्रक्रिया आनंददायी व सुलभ होण्यासाठी सर्व पातळीवर नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहे. प्रत्येक विद्यार्थी प्रगत होण्यासाठी सर्व शिक्षक प्रयत्न करीत आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील सर्व शिक्षकांना व्हावी याच हेतूने सर फाउंडेशन यांचे मार्फत ‘टीचर इनोव्हेशन अवार्ड २०२०’ या नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी केलेल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगाच्या आधारावर नवोपक्रमाची निवड केली जाणार आहे.
राज्यातील पूर्व प्राथमिक स्तरावरील अंगणवाडी कार्यकर्त्या, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता, पर्यवेक्षीय अधिकारी, शिक्षण क्षेत्रात मुक्त काम करणाऱ्या व्यक्ति यांना या स्पर्धेत सहभागी होता येईल. असे फाऊंडेशनचे जळगाव जिल्हा समन्वयक श्री किशोर पाटील कुंझरकर यांनी स्पष्ट केले.
पूर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षण पद्धतीत सुधारणा घडविणे, नाविन्यपूर्ण उपक्रम शिक्षकांच्या व प्रशासनाच्या माहितीसाठी प्रस्तुत करणे, शिक्षकांना कामात प्रोत्साहन देणे, तसेच शिक्षण क्षेत्रातील नवनवीन संकल्पना, विचारप्रवाह, तंत्रे आणि अध्ययन-अध्यापन पध्दती यांचा शोध घेणाऱ्या शिक्षक व अधिकाऱ्यांना उत्तेजन देणे व त्यांच्यातील संशोधनवृत्ती वाढीस लावणे हा या स्पर्धेमागील हेतु असल्याचे त्यांनी म्हटले.सर फाउंडेशन चे राज्य समन्वयक बाळासाहेब वाघ सिद्धार्थ माशाळे हेमलता शिंदे राज किरण चव्हाण,अनघा जहागीरदार आदीजण सातत्याने परिश्रम घेत आहे.

चौकट घेणे

“नवोपक्रम अहवाल लेखनात नवोपक्रमाचे शीर्षक, नवोपक्रमाची गरज व महत्त्व, नियोजन, प्रत्यक्ष कार्यवाही, निष्कर्ष / फायदे, परिशिष्टे, नवोपक्रमाची सद्यस्थिती या मुद्द्यांचा समावेश असावा. शब्द मर्यादा १००० शब्द असून जास्तीत जास्त तीन फोटोचा वापर करावा. अहवाल १० एमबी पर्यंत पीडीएफ स्वरूपात तयार करून http://www.sirfoundation.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पाठवायचा आहे.त्यासंदर्भात कोणाला काही अडचण असेल तर 70 3080 71 90 या क्रमांकावर संपर्क साधावा”
किशोर पाटील कुंझरकर
*जिल्हा समन्वयक
सर फाउंडेशन जळगाव

क्षितीज निवास चिमुकले दत्त मंदिराजवळ आदर्श नगर एरंडोल तालुका एरंडोल जिल्हा जळगाव.


शिक्षकांनी आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा अहवाल बनवितांना तो मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत तयार करावा. इतर राज्यातील शिक्षक देखील यात सहभागी होऊ शकतात. नवोपक्रम हा शिक्षकांनी स्वत: राबविलेला असावा. नवोपक्रम सादर करण्याची अंतिम तारीख १५ जुलै २०२० आहे.
राज्यातील नवोपक्रमशील शिक्षक व अधिकाऱ्यांनी या स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन सर फाउंडेशनचे राज्य समन्वयक सिद्धाराम माशाळे, बाळासाहेब वाघ, महिला राज्य समन्वयक हेमा शिंदे, राजकिरण चव्हाण, सतीश सातपुते, संदीप गुंड, नवनाथ शिंदे, मधुकर घायदार व अनघा जहागिरदार , किशोर पाटील कुंझरकर , योगेश ढवारे,सुनीता पाटील,निलेश प्रभाकर शेळके छाया आरसुळे राजकिरण चव्हाण नम्रता शिंदे पद्मा तायडे सुनील मोरे ज्योती चिकणे मनीषा शेजोळे, खंडू मोरे ,विनीत पद्मवर,देवेंद्र बोरसे मनोज कारभारी सुनंदा भावसार ,अजयलिंबाजी पाटील ,पद्मातायडे अरुणा उदावंत आदी सह राज्यातील सर फाउंडेशन च्या सर्व जिल्हा समन्वयक यांनी केले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: