शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपनी वर गुन्हा दाखल करत नुकसान भरपाई ची आमदार मंगेश चव्हाण यांची मागणी

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी गफ्फार शाह
चाळीसगांव(प्रतिनिधी)-आपल्या कार्यशैली मूळे नेहमी चर्चेत असणारे आमदार मंगेश चव्हाण नेहमीच आपल्या तालुक्यातील विविध समस्यांवर लक्ष देऊन असतात आणी समस्या सोडवण्यासाठी तत्पर असतात अशीच समस्या शेतकऱ्यांसमोर उभी राहिली आहे व आमदार चव्हाण सोडविण्यासाठी सज्ज
बोगस बियाण्यांमुळे चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीसंदर्भात कृषी मंत्री मा.दादाजी भुसे यांची भेट घेत शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपनी वर कारवाई करत गुन्हा दाखल करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवुन देण्याची मागणी केली आहे
बोगस बियाण्यांमुळे चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीसंदर्भात राज्याचे कृषिमंत्री मा.दादाजी भुसे , कृषी विभागाचे प्रधान सचिव मा.एकनाथ डवले व अतिरिक्त पोलीस महासंचालक मा.राजेंद्र सिंह यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले, संबंधित हायटेक कंपनीच्या ३२०६ या ज्वारी वाणाच्या कणसांना दाणेच न आल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याने कंपनीवर गुन्हा दाखल करून शेतकऱ्यांच्या झालेल्या कोट्यवधीच्या नुकसानाची भरपाई मिळावी अशी मागणी केली. यावेळी माजी आमदार तथा कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल, भाजपा शहर सरचिटणीस जितेंद्र वाघ आदी उपस्थित होते.
याबाबत कृषीमंत्री मा.दादाजी भुसे यांनी तात्काळ राज्याचे गुणनियंत्रक संचालक यांना चौकशीचे आदेश देऊन सबंधित कंपनीवर कारवाई करण्याचे आदेश दिले तसेच कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले तर कृषी विभागाचे प्रधान सचिव मा.एकनाथ डवले साहेब यांनी देखील या प्रकरणात स्वतः वैयक्तिक लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.