शोध 1 मोटार सायकलीचा सापडल्या 4,चार दिवसात आरोपीसह मोटार सायकली ताब्यात,शहर पोलिसांची कामगिरी

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगांव(प्रतिनिधी)-26 जून रोजी होंडा शाईन चोरी 30 जून आरोपिसहित मोटार सायकल पोलिसांच्या ताब्यात अवघ्या 4 दिवसात चोराचा तपास शहर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी.
26 जून रोजी सागर प्रवीण केले यांनी 25000 किमतीची काळ्या रंगाची होंडा कंपनी ची सीबी शाईन मोटार सायकल क्रमांक एम एच 19 बी एक्स 1203 देशमुखवाडा जुने नागरपालिकेजवळून चोरी झाल्याची शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती या तक्रारीवरून तपास करत असलेले पो ना राहुल सोनवणे व पो कॉ विनोद खैरनार यांना गोपनीय माहिती मिळाली होती त्या माहिती च्या आधारे पो ना राहुल सोनवणे,पो कॉ विनोद खैरनार,विजय पाटील यांनी तपास चक्र फिरवत आरोपी सतिश सुरेश पाटील वय 19 रा पथराड ता भडगाव यास ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता चाळीसगांव येथील काळ्या रंगाची होंडा कंपनी ची सीबी शाईन मोटार सायकल क्रमांक एम एच 19 बी एक्स 1203 या 25 हजार रुपये किमतीच्या मोटार सायकलीसह नांदगाव येथून चोरलेल्या 3 मोटार सायकली अश्या एकूण 4 एकूण 1लाख 25 हजार रुपये किंमतीच्या आरोपीने काढून दिल्या आहेत,सोबत साथीदार विलास रवींद्र देसले(पाटील) वय 23 रा बंडू नाना चौक मारुती मंदिर पिंप्रीहाट सावदा यास सुद्धा अटक करण्यात आली असून दोन्ही आरोपींवर भादवी कलाम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे,उपविभागीय पोलीस अधिकारी भरत काकडे,पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सचिन कापडणीस,पोहेकॉ सुहास आव्हाड, पोना अभिमन पाटील,राहुल सोनवणे, सुभाष घोडेस्वार, दिपक पाटील, महेंद्र पाटील, पोकॉ भुषण पाटील,निलेश पाटील, विजय पाटील, शरद पाटील,अमोल भोसले, विनोद खैरनार, प्रविण जाधव आदींनी केली असून पुढील तपास पोना राहुल सोनावणे व गुन्हे शोध पथकातील अंमलदार करीत आहे.