संघर्षनायक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०१वी सुवर्णमहोत्सवी जयंती लहुजी शक्ती सेनेतर्फे दिमाखात साजरी..

1 0
Read Time2 Minute, 4 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी गफ्फार शाह

डोणदिगर(चाळीसगाव)-दि.१ऑगस्ट,२०२१,रविवार रोजी, डोणदिगर चाळीसगाव तालुक्यात लहुजी शक्ती सेनेतर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंती साजरी करीत भव्य मिरवणूक काढण्यात आली,

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश महानिरीक्षक नीरज चव्हाण होते, सोबतच प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी विकास परिषदेचे तालुकाध्यक्ष विनोद साळुंके, डोणदिगर ग्रामपंचायतचे उपसरपंच बंटी भाऊ पाटील, ग्रामपंचायत सदस्य सजन पाटील,खडु मोरे,बापु शेठ,प्रविन वाघ,लवकेश चौधरी,युवा उद्योजक अविनाश मोरे होते.
मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या समाज बांधवाना संबोधित करतांना कार्यक्रमाचे अध्यक्ष नीरज चव्हाण यांनी समाजाला जाज्वल्य इतिहास लाभला असून समाजाने त्याचे स्मरण करत आपल्या हक्कांसाठी व न्यायासाठी संघर्षनायक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची प्रेरणा घेत रस्त्यावर उतरून अधिकार प्राप्त करून घेत उन्नती साधावी यासाठी प्रयत्न करावा असे मत व्यक्त करत लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जीवनप्रवास उलगडलून सांगितला,
सर्व उपस्थित मान्यवरांचे लहुजी शक्ती सेनेचे डोणदिगर चे शाखाध्यक्ष आप्पासाहेबांनी आभार मानले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.