Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

दौंड पोलीस निरीक्षक श्री नारायण पवार पुणे टाइम्स मिरर अवार्ड ने सन्मानित

0
1 0
Read Time3 Minute, 39 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड(प्रतिनिधी)-2019 मध्ये नुकताच कोरोनाचा संसर्गजन्य रोग सुरु झाला होता,त्या काळात पोलिस निरीक्षक नारायण पवार हे जिल्हा विशेष शाखा येथे पोलीस निरीक्षक म्हणून नेमणूकिस होते
त्या ठिकाणी माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप पाटील साहेब यांनी त्यांची जिल्हा समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक केली,या काळामध्ये सर्व जनता भयभीत झाली होती अचानक लॉक डाऊन जारी करण्यात आला होता,अशा काळामध्ये पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या आरोग्याची सुरक्षा त्यांना औषध पोहोच करणे,त्यांना यंत्रसामुग्री तसेच सेनी टायझर मास्क पी पी कीट अशी साधने पुरवठा करणे प्रत्येक पोलीस स्टेशनला मनुष्यबळ पुरवठा करणे तसेच जिल्ह्यात नियमाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर पोलीस स्टेशन मार्फत कारवाई करण्याचे आदेश देणे,कारवाई करून घेणे तसेच अडकलेले मजूर कामगार यासाठी कॅम्पची व्यवस्था करणे त्यांची जेवणाची सोय करणे लोकांची जाण्याची व्यवस्था करणे त्यांना राहण्याची व्यवस्था करणे,ऑनलाईन पासेस सर्व जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेसाठी पुरवठा करणे, अत्यावश्यक सेवेचा पुरवठा करणे तसेच जिल्ह्यासाठी लागणारा ऑक्सिजन बाहेरून जिल्ह्यातून सर्व जिल्ह्यातील केंद्रावर पुरवठा करणे तसेच ऊसतोड कामगार मजूर यांची राहण्याची व्यवस्था करणे तसेच पोलीस अधिकारी कर्मचारी यांना ज्यांना करून झाला आहे,अशांना दवाखान्यात बेडची व्यवस्था करणे त्यांच्या नातेवाईकांना बेडची व्यवस्था करणे गोळ्या औषध पुरवणे धीर देणे आधार देणे अशा पद्धतीची मोलाची कामगीरी केली म्हणून माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख साहेब यांनी त्यांच्या उत्कृष्ट कामाची दखल घेत पुणे टाइम्स मिरर अवार्ड साठी शिफारस केली होती सदरचा अवार्ड त्यांना माननीय गृहमंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे
पोलीस निरीक्षक नारायण पवार यांना यापूर्वी देखील आशा चांगल्या कामगिरीचे अनेक अवॉर्ड प्राप्त झालेले आहेत गडचिरोली जिल्ह्यात सेवा बजावलेली आहे, तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अनेक वेळा प्रशंशा पत्र देऊन त्यांना गौरवण्यात आलेले आहे,या अवॉर्डामुळे सर्वत्र पोलीस निरीक्षक नारायण पवार यांचे कौतुक होत असून,शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: