Read Time3 Minute, 49 Second
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
रक्तदान हि मानवतेची सर्वोच्च सेवा : २०० निरंकारी भक्तांनी केले रक्तदान…
दौंड(प्रतिनिधी)-सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने पुणे झोन मधील ब्रांच दौंड येथे संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनद्वारा विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन ०१ ऑक्टोबर २०२३ रोजी करण्यात आले होते. ज्यामध्ये नानगाव ,दौंड, पाटस या ठिकाणाहून २०० निरंकारी भक्तांनी निस्वार्थ भावनेने रक्तदान केले. ससून रुग्णालय रक्तपेढी पुणे यांनी २०० युनिट रक्त संकलन केले.
या शिबिराचे उदघाटन आदरणीय श्री अंगद जाधव ,विलास रासकर,दत्तात्रय सातव यांच्या उपस्थित संपन्न झाले. या रक्तदान शिबिराला विनिता साहू मॅडम ( आय. पी.एस .) तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते यांनी सदिच्छा भेट देऊन मिशनच्या कार्याचे कौतुक केले.
संत निरंकारी मिशनद्वारे पहिल्या रक्तदान शिबिराचे आयोजन दिल्ली येथे नोव्हेंबर १९८६ मध्ये संत निरंकारी समागमामध्ये करण्यात आले होते, ज्याचे उदघाटन बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी केले होते आणि ही मोहीम मिशनच्या अनुयायांद्वारे मागील ३६ वर्षांपासून निरंतर अशीच चालू असून १३ लाखाहून अधिक युनिट रक्त संकलन करण्यात आले आहे. बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी मानवतेला संदेश दिला कि 'रक्त नाल्यांमध्ये नाही, नाड्यांमध्ये वाहिले पाहिजे'. संत निरंकारी मिशनच्या अनुयायांनी हा संदेश निश्चितपणे चरितार्थ केला असून आज वर्तमान काळात सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या निर्देशानुसार निरंतर पुढे नेला जात आहे.
संत निरंकारी मिशन द्वारा मानवतेच्या कल्याणार्थ वेळो-वेळी संपूर्ण विश्वामध्ये अनेक जनसेवेचे उपक्रम आयोजीत करण्यात येतात, ज्यामध्ये मुख्यतः स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, निशुल्क आरोग्य तपासणी ,नेत्र चिकित्सा शिबीर तसेच महिला सशक्तीकरण, बाल-विकास, नैसर्गिक संकटांच्या वेळी सहायता यांसारख्या कल्याणकारी योजनांचे आयोजन केले जाते. यासारख्या सर्व सामाजिक कार्यासाठी भारत सरकार तसेच राज्य सरकारांद्वारे मिशनला वेळोवेळी सन्मानित करण्यात आले आहे.
गेल्या १५ दिवसांपासून मिशनचे सेवादार यांनी दौंड परिसरामध्ये नुक्कड नाटिका द्वारे व प्रत्यक्ष भेटून रक्तदानाची जनजागृती करण्यात आली, रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी संत निरंकारी सेवादल, मिशन चे अनुयायी यांचे योगदान लाभले.