Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

संत निरंकारी मिशन करणार ‘वननेस वन’ प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याचा प्रारंभ

0
0 0
Read Time4 Minute, 40 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

पुणे(प्रतिनिधी)- ११ ऑगस्ट, २०२३ – निरंकारी बाबा हरदेव सिंह जी यांनी दिलेला संदेश ‘प्रदूषण आतील असो किंवा बाहेरील ते हानिकारक आहे’ – निरंकारी मिशन या अमूल्य विधानाचा उपयोग गेली अनेक वर्षे विविध सामाजिक सेवाभावी उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरक शक्ती म्हणून करत आहे. या कल्याणकारी उपक्रमांमध्ये बहुधा वृक्षारोपण मोहीम, रक्तदान शिबिरे, स्वच्छता मोहीम, जलसंधारण प्रकल्प, पर्यावरणविषयक समस्यांबद्दल जागरूकता मोहीम इत्यादींचा समावेश होतो. मानवतेला वाहिलेल्या निरंकारी मिशनच्या या सर्व सेवा सतगुरु माताजींच्या मार्गदर्शनाखाली भक्तांकडून सुरू आहेत.
सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता जी यांच्या पवित्र आशीर्वादाने, समाजकल्याणाच्या भावनेने प्रेरित होऊन ऑगस्ट २०२१ मध्ये संत निरंकारी मिशनने पर्यावरण संरक्षणाच्या निमित्ताने ‘वननेस वन’ नावाचा स्तुत्य प्रकल्प सुरू केला. ‘झाडांचा समूह’ लावणे आणि त्यांची काळजी घेणे हा या प्रकल्पाचा उद्देश होता. या प्रकल्पांतर्गत संपूर्ण भारत देशामध्ये सुमारे ३१७ ठिकाणी १.३० लाख रोपांची लागवड करण्यात आली.
संत निरंकारी मंडळाचे सचिव श्री जोगिंदर सुखीजा यांनी माहिती देताना सांगितले की, ‘वननेस वन’ प्रकल्पाचा दुसरा टप्पा २०२२ मध्येही राबविण्यात आला ज्याअंतर्गत ३१७ वरून ४०३ ठिकाणी लागवड झाली असून १.६५ लाख रोपांची लागवड झाली आहे. पर्यावरण रक्षणासाठी सुरू असलेल्या या मालिकेअंतर्गत, संत निरंकारी मिशन, सतगुरु माता सुदिक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता जी यांच्या पवित्र आशीर्वादाने, ‘वननेस वन’ प्रकल्पाच्या तिसर्‍या टप्प्याची सुरुवात होत आहे , ज्या अंतर्गत भारतभरात ५०० हून अधिक ठिकाणी रविवार, १३ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ८:०० वाजेपासून ‘वृक्षारोपण मोहीम’ आयोजित करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यामध्ये खुटबाव (दौंड),भवरापूर ,कोरेगाव मुळ ,कामशेत ,पाषाण या ठिकाणी मागील दोन टप्यामध्ये ४५००० झाडे लावण्यात आली असून आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या टप्प्यामध्ये २५००० रोपांची लागवड करण्याचा संकल्प आहे अशी माहिती पुणे झोनचे प्रभारी ताराचंद करमचंदानी यांनी दिली .
आज पृथ्वीला ग्लोबल वार्मिंगची समस्या भेडसावत असताना वृक्ष लागवडीचे महत्त्व अधिकच वाढले आहे. २०२० सालापासून, कोरोना संकटाने आपल्या सर्वांना निसर्गाची अमूल्य देणगी, प्राण वायु म्हणजेच ऑक्सिजनचे महत्त्व समजावून सांगितले. यासोबतच त्याच्या कमतरतेमुळे होणार्‍या सर्व दुष्परिणामांचीही आम्हाला चांगली जाणीव करून देण्यात आली. मानवी जीवन ज्या ऑक्सिजनवर आधारित आहे, तो आपल्याला या झाडांपासूनच मिळतो, हे जाणून घेतले पाहिजे. त्यामुळे त्यांचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्यच नाही तर आपल्या जीवनासाठीही महत्त्वाचे आहे.
निरंकारी मिशनच्या अशा कल्याणकारी योजना ‘पर्यावरण संरक्षण’ आणि पृथ्वीच्या सुशोभीकरणासाठी एक कौतुकस्पद आणि स्तुत्य पाऊल आहे, ज्याचा अवलंब करून पृथ्वी अधिक स्वच्छ, सुंदर आणि निर्मळ होऊ शकते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: