संभाजी सेनेच्या वतीने पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न,विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार

0 0
Read Time4 Minute, 15 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी गफ्फार शाह
 चाळीसगाव(प्रतिनिधी)-दिनांक १२ जानेवारी २०२१ रोजी जिजाऊ जयंती, स्वामी विवेकानंद जयंती तसेच संभाजी सेनेच्या ९ व्या वर्धापन दिनानिमित्त समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ ,छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा पूजन करून करण्यात आली प्रतिमा पूजन सौ. आरतीताई पूर्णपात्रे, ऍड. आशा शिरसाठ,  प्राचार्य साधना निकम, सौ. संपदा पाटील नगरसेवका विजया पवार, सविता राजपूत, सविता कुमावत सोनल साळुंखे यांचे हस्ते करण्यात आले.    
   यावेळी कोरोना काळात विशेष सेवा बजाविलेले डॉ. मंगेश वाडेकर व डॉ. सौ. पल्लवी वाडेकर, तसेच चाळीसगाव शहरात हजारो वृक्षाची लागवड करून वृक्ष संवर्धन चळवळ जोपासणारे वर्धमान धाडीवाल, चाळीसगाव शहरात स्वच्छता मोहीम राबविणारे विजय शर्मा, तालुक्यात हजारो युवकांच्या साथीने गरजू रुग्णाना रक्त पुरवठा करणारे पंकज पाटील , तसेच न डगमगता वैदकीय सेवेत पोस्टमार्टेम करणारी तरुण युवती सपना चावरे या सर्वांना संभाजी सेनेच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.                    सालाबादप्रमाणे संभाजी सेना दिनदर्शिकेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले सदर कार्यक्रमात संभाजी सेना संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब शिरसाठ, डॉ सुनील राजपूत, सह्याद्री प्रतिष्ठानचे प्रदेश अध्यक्ष दिलीप घोरपडे, सुधीर आबा पाटील, अरुण पाटील, योगेश पाटील, बबन पवार,विजय गवळी ,योगेश भोकरे, अजय वाणी सचिन पवार वकील संघाचे अध्यक्ष प्रमोद एरंडे ऍड सुलभ8पवार पत्रकार भुरन घुले, प्रवीण गवळी, महेंद्र बिराडे,दिनेश मोरे,खुशाल पाटील, संजय सोनवणे, बी के सुनीता दीदी, मिनवती जगताप अनिता शर्मा सुचित्रा राजपूत रमेश पोतदार, आदी मान्यवर उपस्तीत होते. सदर कायक्रमात कु. ग्रीष्मा पाटील, गायत्री चौधरी यांनी गितगायन केले कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन शालीग्राम निकम सर यांनी केले,  कार्यक्रमाची सांगता प्रकाश चौधरी यांच्या 
राष्ट्रगीत बासरीवादनाने झाली. यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संभाजी सेना शहर अध्यक्ष अविनाश काकडे, जिल्हा संघटक सुनील पाटील,तालुका अध्यक्ष गिरीश पाटील, विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण बनकर शेतकरी आघाडी जिल्हा अध्यक्ष सुरेश पाटील, दिवाकर महाले, ज्ञानेश्वर पगारे,विजय देशमुख,  भेय्यासाहेब देशमुख, बंटी पाटील,सनी मराठे, अमर भोई, लक्ष्मण बनकर,कृष्णा पाटील, आबा सैदाने, संदीप जाधव, सचिन जाधव, यश सूर्यवंशी, कुणाल आराक, रोहित वाणी, सुनील ठाकूर, राकेश पवार, आदींनी परिश्रम घेतले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.