Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

चाकूने भोसकून मायलेकरांचा खून वाल्हेकरवाडी येथील घटना

0
1 0
Read Time2 Minute, 25 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी सनी घावरी

वाल्हेकरवाडी(प्रतिनिधी) : अज्ञात व्यक्तीने चाकूने वार करून मायलेकरांचा निघृण खून केला. ही घटना शनिवारी (दि. ९) रात्री आठच्या सुमारास वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे उघडकीस आली. सुमय्या नासिर शेख (४०) आणि तिचा मुलगा आयान (३) अशी त्यांची नावे आहेत.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधाकर काटे यांनी दिलेल्या
माहितीनुसार, वाल्हेकरवाडी येथील एका बंद खोलीतून उग्र वास येत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी त्या बंद खोलीत मायलेकरांचे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह आढळून आले. पोलिसांना घटनास्थळावर रक्ताने माखलेला चाकू आणि खोलीबाहेर बिअरच्या बाटल्या, बिस्किटचे पुडे मिळून आले. पोलिसांनी घरमालकाकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी१५ डिसेंबर रोजी दोन तरुणांना ही खोली भाड्याने दिल्याचे सांगितले; मात्र बुधवार (दि. ६) पासून ते दोन्ही तरुण फरार झाल्याने त्यांच्यावर संशय बळावला आहे. ही मायलेकरे नेमकी कोठून आली आहेत. तसेच, या ठिकाणी कधीपासून राहात आहेत, याबाबत रात्री उशिरापर्यंत माहिती मिळू शकली नाही.घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त मंचक इप्पर, सहायक आयुक्तनंदकिशोर भोसलेपाटील, वरिष्ठ निरीक्षक सुधाकर काटे, सहायक निरीक्षक अभिजित जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पुढील तपास सुरू आहे

Happy
Happy
50 %
Sad
Sad
25 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
25 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: