सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तीच्या पुतळ्याचे दहन

संपादक गफ्फार शेख (मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव प्रतिनिधी -सपूर्ण मराठा समाजाविरोधात अपशब्द वापरणारा नारायण राणे तसेच मराठा आरक्षणाला विरोध करणारे नारायण राणे,गुणरत्न सदावर्ते,रामदास कदम ,सदाभाऊ खोत,छगन भुजबळ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात दि २९ रोजी दहन करण्यात आले,यावेळी घोषणानी परीसर दुमदुमून गेला.
सपूर्ण मराठा समाजाविरोधात नारायण राणे याने अपशब्द वापरल्याने महाराष्ट्रात मराठा समाज नारायण राणेच्या विरोधात प्रचंड आक्रमक झाला आहे, तसेच मराठा आरक्षणाला विरोध करणारे नारायण राणे,गुणरत्न सदावर्ते,रामदास कदम ,सदाभाऊ खोत तसेच अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या झालेल्या सभेला पैसे कुठून येतात असे बेताल वक्तव्य करणारे छगन भुजबळ यांच्या पुतळ्याचे दहन चाळीसगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दि २९ रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले,यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय ,दुरी तीरी एक्का नारायण राणे छक्का,पाऊस पडला गाराचा रामदास कदम बाराचा,सदावर्तेचे करायचे काय खाली डोक वरती पाय ,सदाभाऊ खोत मुर्दाबाद, एक मराठा लाख मराठा,आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाचे बापाचे ,कोण म्हणत देणार नाही घेतल्या शिवाय राहणार नाही या घोषणानी परीसर दुमदुमून गेला. यावेळी गणेश पवार बोलताना म्हणाले की मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्या पाच रावणाचा पुतळा सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाळण्यात आला आहे. या मराठा समाजद्रोहीनी मराठा समाजाविरोधात जर यापुढे अपशब्द वापरले आणि आरक्षणाला विरोध केला तर यांना घरी जाऊन ठेचल्याशिवाय मराठा समाज स्वस्थ बसणार नसल्याचे यावेळी सांगितले ,यावेळी बोलताना प्रमोदबापु पाटील म्हणाले की नारायण राणे,गुणरत्न सदावर्ते यांचे बक्षिसे मिळविण्यासाठी आणि वतने टिकवण्यासाठी मराठा समाजाच्या आरक्षणाला वेगळे वळणावर नेण्याचा प्रयत्न करत आहेत यांना वतन देणाऱ्यांना देखील समाज यापुढे धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. समाज आरक्षणासाठी एक संघ झाला आहे आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असे सांगितले,लक्ष्मण शिरसाठ म्हणाले की पाच रावणानी मराठा आरक्षणाला विरोध केल्याने त्यांचा जाहीर निषेध करतो .मराठा समाजाविषयी अपशब्द वापरणारे नारायण राणे तसेच मराठाद्रोहींचे वागणे बदलले नाही तर मराठा समाज यांना प्रत्यक्षात गाड्यासह जाळल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे सांगितले, अरुण पाटील ,गणेश पवार, लक्ष्मण शिरसाठ, प्रमोद पाटील, प्रशांत गायकवाड,प्रा तुषार निकम ,खुशाल बिडे खुशाल मराठे, मा सैनिक आबासाहेब गरुड,जी जी वाघ, तमाल देशमुख ,दादा पाटील, नंदकिशोर जाधव ,एड विलास पाटील, मनोज भोसले, विकास पवार ,सुनील पाटील, सिद्धार्थ देशमुख ,सागर पाटील ,सतीश पवार, अविनाश काकडे, सुदर्शन देशमुख ,दत्ता पवार, किरण आढाव, संतोष फडतरे, विकास पाटील, दीपक पाटील, अनिल कवडे, छोटू अहिरे, गुड्डू पगार, प्रा चंद्रकांत ठाकरे ,अनिल पाटील, अरविंद पाटील, किशोर देशमुख ,चेतन देशमुख, प्रदीप राव देशमुख, सचिन पवार, सुनील पवार, शरद पवार, किरण पवार,स्वप्नील गायकवाड, किरण देशमुख ,गोरख साळुंखे यांच्यासह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता