अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलीक उपसंपादक रोहित शिंदे

कोरोना च्या साथीमुळे करण्यात आलेल्या लॉक डाऊन मुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे .
कष्टकरी रोजंदारी कामगार रस्त्यावर आला आहे .
अशा संकटग्रस्त कुटुंबांना किराणा वाटप करण्याची मोहीम समता सैनिक दल चाळीसगाव मार्फत 11 जून पासून राबविण्यात येत आहे .
या मोहिमेस अनेकांचे सहकार्य लाभत आहे .
आज दि.1जुलै 20 बुधवार रोजी या मोहिमेचा चौथा टप्पा पूर्ण करण्यात आला.
या टप्प्यात फुले नगर या परिसरातील एकूण 40 कुटुंबांना किराणा साहित्य वाटप करण्यात आले .
मा. धर्मभुषण बागुल (राष्ट्रीय संघटक:समता सैनिक दल )यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्य उपस्थितीत व बालाजी ट्रेडिंग कंपनी चे संचालक मा.रमेश वाणी यांचे हस्ते हे वाटप करण्यात आले .
यावेळी.. समता सैनिक दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते महेंद्र जाधव .परिसरातील कार्यकर्ते प्रदीप अहिरे ,विजय शेजवळ ,राजू शिरसाठ ,नवनाथ राठोड , भूषण शिरसाठ ,राहुल निकम ,किशोर पाटील , व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले .
या पूर्वी तीन टप्प्यात 370 कुटुंबांना व आजचे 40 अशी आता पर्यंत 410 कुटुंबांना मदत देण्यात आली आहे .
या कार्यात ज्यांनी सहकार्य व सहयोग दिला त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार …..!
स्वप्नील जाधव
तालुकाध्यक्ष
समता सैनिक दल
चाळीसगाव