सर्वोत्तम वैद्यकीय सेवा हाच उद्देश: डॉ शैलेंद्र सुर्यवंशी,रुग्णालयाचा वा वर्धापनदिन साजरा

संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)- ‘‘सर्वोत्तम आणि परवडणारी वैद्यकीय सेवा हाच रुग्णालय सुरू केल्यापासूनचा आमचा उद्देश आहे,’’ असे बालरोगतज्ज्ञ आणि संजीवनी रुग्णालयाचे संस्थापक संचालक डॉ.शैलेंद्र विजयसिह सुर्यवंशी यांनी सांगितले.संजीवनी रुग्णालयाने आपला 9 वा वर्धापनदिन साजरा केला.बालरोगाबद्दल उत्कृष्ट सेवा सातत्याने देणे आणि त्या नियमितपणे वृद्धींगत करणे हे या रुग्णालयाचे ध्येय असल्याचे डॉ. सुर्यवंशी यांनी स्पष्ट केले.
15 ऑगस्ट 2014 रोजी रुग्णसेवेची सुरवात चाळीसगाव पंचक्रोशीत करण्यात आली. रुग्णालयाने प्रत्येक वर्षी यशाचे नवे शिखर सर केले आहे. तसेच, प्रत्येक वर्षांनंतर आमच्या प्रवासात एक मैलाचा दगड रचला आहे. यात सर्वांत मोठी साथ आम्हाला रुग्णसेवेची संधी देणाऱ्या सगळ्यांची होती. त्याशिवाय हे शक्य झाले नसते. ही साथ आणि हा विश्वास खूप मोलाचा आहे. रुग्णालयात वैद्यकीय सेवेसाठी नेहमीच सज्ज आहोत. ‘‘रुग्णसेवेसाठी डॉक्टरांनी सदैव तत्पर राहणे आवश्यक आहे. नातेवाईकांप्रमाणे आपल्या रुग्णांची काळजी घ्या. त्यांना मायेचा स्पर्श द्या आणि त्यांच्यासोबतच नाते घट्ट करण्याचा सातत्याने प्रयत्न करा.’’वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते. या वेळी अमोल राऊळ, नंदन महाजन, गौरव गवळी, आदित्य मेडिकल व संजीवनी हॉस्पिटल परिवारातर्फे डॉ सुर्यवंशी यांना वर्धपान दिनाच्या शुभेच्छा दिल्या