Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

सेतू कार्यालयाकडून विद्यार्थी व नागरिकांची होणारी आर्थिक लूट थांबवण्यात यावी-गौतम कांबळे राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ

1 0
Read Time2 Minute, 17 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

पुणे(प्रतिनिधी)-जिल्ह्यातील सेतू कार्यालयातून विद्यार्थी व पालकांची होणारी आर्थिक लूट थांबवण्यात यावी अशी मागणी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ . राजेश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे .
याविषयी आमच्या प्रतिनिधीशी सविस्तरपणे बोलताना गौतम कांबळे म्हणाले की ,जिल्ह्यातील सेतू कार्यालयाकडून विद्यार्थी व नागरिकांची आर्थिक लूट केली जात आहे . अडवणूक केली जात आहे .ही बाब गंभीर आहे .सर्वसामान्य नागरिकांना स्वस्तात सेवा उपलब्ध व्हावी म्हणून सेतू कार्यालयाची सरकारने स्थापना केलेली आहे परंतु त्या ठिकाणी विद्यार्थी व पालकांची आडवणूक ,आर्थिक पिळवणूक केली जात आहे .दौंड जिल्हा पुणे येथील सेतू केंद्रात दोन विद्यार्थ्याला उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी सेतू कार्यालयात रू . 280 /- द्यावे लागले आहेत .ही बाब गंभीर आहे .याची आपल्या स्तरावरून चौकशी व्हावी व सर्वसामान्य विद्यार्थी , पालक यांना न्याय द्यावा अशी विनंती निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी पुणे तसेच एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री ,राधाकृष्ण विखे पाटीलसाहेब महसूल मंत्री ,मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य ,उपविभागीय अधिकारीसाहेब ,दौंड-पुरंदर ,तहसीलदारसाहेब दौंड जिल्हा पुणे यांना निवेदनाच्या प्रति पाठवल्या आहेत .

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top
error: Content is protected !!
%d bloggers like this: