अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
दौंड प्रतिनिधी पवन साळवे
मध्य रेल्वे प्रसिद्धीपत्रक सोलापूर विभाग
आरक्षण तिकिटाचा (पीआरएस) काउंटरवर परतावा.
कोरोनाव्हायरस मुळे पूर्ण देशभरात लॉक डाऊन करण्यात आले आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाने यात्री मेल एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे आरक्षण केंद्र सुद्धा बंद करण्यात आले होते. ज्या यात्रीने आरक्षित तिकीट खरेदी केले होते, त्यांच्या तिकिटाचा परतावा करण्यात येत आहे. अपेक्षित गर्दीच्या चांगल्या व्यवस्थापनासाठी 26-5-22020 पासून आरक्षण खिडकीवर (पीआरएस) काउंटरवर परतावा देण्याचे वेळापत्रक ठरविले आहे. त्यामध्ये दिलेला परतावा वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:-
दिनांक 22-3-2020 ते 30–06-2020 पर्यंत देण्यात आलेल्या पीआरएस तिकिटांचा परतावा खालीलप्रमाणे असेल.
- आरक्षित तिकीटा प्रमाणे यात्रा दिनांक 23. 3. 2020 ते 31. 3. 2020 तिकिटाचा परतावा दिनांक 26.05.2020 पासून देण्यात येणार आहे.
- आरक्षित तिकीटा प्रमाणे यात्रा दिनांक 01.0 4. 2020 ते 14.04.2020 तिकिटाचा परतावा दिनांक 01.06. 2020 पासून देण्यात येणार आहे.
- आरक्षित तिकीटा प्रमाणे यात्रा दिनांक 15.04.2020 ते 30.04.2020 तिकिटाचा परतावा दिनांक 07.06.2020 पासून देण्यात येणार आहे.
- आरक्षित तिकीटा प्रमाणे यात्रा दिनांक 01.05. 2020 ते 15. 05. 2020 तिकिटाचा परतावा दिनांक 14. 6. 2020 पासून देण्यात येणार आहे.
- आरक्षित तिकीटा प्रमाणे यात्रा दिनांक 16.05.2020 ते 31. 05. 2020 तिकिटाचा परतावा दिनांक 21.06.2020 पासून देण्यात येणार आहे.
- आरक्षित तिकीटा प्रमाणे यात्रा दिनांक 01.06. 2020 ते 30.06. 2020 तिकीटाचा परतावा दिनांक 28. 06. 2020 पासून देण्यात येणार आहे.
कोविड -1 च्या नियंत्रणासाठी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे कठोर पालन करण्याचे निर्देश सर्वांना देण्यात आले आहेत. काउंटरवर गर्दी व्यवस्थापित करण्यासाठी पुरेसे आरपीएफ कर्मचारी तैनात करण्यात आले आहे.
रेल्वे प्रवाशांना रेल्वे प्रशासन आवाहन करते की वरील दिलेल्या तारखेस लक्षात घेऊन आपल्या आरक्षित तिकिटाचा परतावा घ्यावा ही नम्र विनंती.
मध्य रेलवे मंडल रेल प्रबंधक कार्यालय,
वाणिज्य शाखा सोलापूर