अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगांव प्रतिनिधी-गेल्याच आठवड्यात उत्तर प्रदेशातील हाथरस येथील दलित तरुणीवर बलात्कार करुन निघृण खुन करण्यात आला. सदर घटना ही माणुसकी ला काळीमा फासणारी आहे. संबंध देशभर घटनेच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. भारतात बलात्काराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सदर गुन्ह्याचा जलद गतीने तपास करुन पिडीतेला न्याय मिळवुन देण्याकरता खालील मागण्या करण्यात येत आहे.
१) मृत्युपुर्वी तयार केलेल्या व्हिडियोत पिडीतेने जो जबाब दिला आहे, त्याला Dying Declaration समजुन आरोपींवर खटला चालवण्यात यावा.
2) पिडीतेच्या कुटुंबियांनी CBI चौकशी करण्यास विरोध केला आहे त्यामुळे सीबीआय चौकशी न करता SIT मार्फत सुरु असलेला तपास पुढे सुरु ठेवावा.
3) मृत पिडीतेच्या कुटुंबियांवर चाललेली दडपशाही लवकरात लवकर थांबवावी व मृत पिडीता आणि तिचे कुटुंबियांना जलद गतीने न्याय प्राप्त करुन द्यावा
असे निवेदन तहसीलदार अमोल मोरे यांना पीपल्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने देण्यात आले यावेळी पीपल्स सोशल फाउंडेशन अध्यक्ष आकाश पोळ,मुख्य संघटक-हर्षल माळी, करण राजपुत प्रवीण जाधव,निलेश महाले, महेंद्र कुमावत ,संघटक-लेवेश राजपुत, गौरव पाटिल,विशाल चौधरी, शिरसाठ ,अमोल पवार ,विकास अजबे ,जय गवळी ,भुषण बविस्कर, अजयकुमार झालटे, दीपक वाघ,भुषण पाटिल आदी उपस्थित होते.