Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

अवैध मुरूमाचे उत्खनन,ग्रामीण पोलिसांनी केला कारवाई साठी तहसीलदारांना रिपोर्ट सादर

0
0 0
Read Time2 Minute, 45 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

संपादक गफ्फार मलिक

चाळीसगांव(प्रतिनिधी)-दि 12 जून रोजी ग्रामीण पोलीस अवैध धंद्यांवर छापे टाकण्यासाठी जात असतांना रांजणगांव शिवारात बाणगांव धरणाच्या अलीकडे विना नंबर प्लेट ट्रॅक्टर ट्रॉली विना परवाना अवैध मुरूम उपसा करतांना ग्रामीण पोलिसांनी घेतली ट्रॅक्टर ट्रॉली सोबत आरोपीस घेतले ताब्यात.

ग्रामीण पोलिसांचे पथक सकाळी 7.00 वाजेच्या सुमारास अवैध धंद्यांवर छापे टाकण्यासाठी जात असतांना रांजणगांव शिवारात बाणगांव धरणाच्या अलीकडे राजू मोरे नावाचा इसम हा त्याचे त्याब्यातील बिना नंबरच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये अवैध गौणखनिज मुरुम भरतांना मिळून आले आहे. त्यास त्याचेकडे मुरम खोदण्याचा व वाहतूकीचा परवाना आहे अगर कसे याबाबत विचारपूस केली असता त्याने उडवा उडवी ची उत्तरे देत कोणताही परवाना नसल्याचे कबूल केल्याने, सदर इसम हा विना पास परवाना अवैध गौणखनिज मुरुमची चोरटी वाहतूक करीत असल्याची खात्री झाल्याने त्यास चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशनला टॅक्टरसह आणून टॅक्टर पोलीस कवायत मैदान, चाळीसगांव येथे लावण्यात आले असून ,सदरबाबत तहसीलदार यांना रिपोर्ट सादर करुन पुढील योग्य ती दंडात्मक करावाई होणेसाठी विनंती करण्यात आलेली आहे.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. डॉ. प्रविण मुंढे, जळगांव, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. भरत काकडे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली श्री. संजय ठेंगे, सपोनि रमेश चव्हाण, सपोनि डि.व्ही, सुंदरडे, पोलीस उपनिरीक्षक श्री. लोकेश पवार, पोना शांताराम पवार, पोना देविदास पाटील, पोना भूपेश वंजारी, पोना ज्ञानेश्वर बडगुजर, पोना प्रेमसिंग राठोड या पथकाने केली आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: