अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
कासोदा (ता. एरंडोल) – कासोदा गावालगत बांभोरी शिवारातील गालापुर रोडवरील फैजल शेख यांच्या शेतात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर कासोदा पोलीसांनी धाड टाकून सात जुगारींना ताब्यात घेतले.
ही कारवाई ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता करण्यात आली.सपोनि/निलेश राजपुत यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोना अकिल मुजावर, पोकॉ/समाधान तोंडे, पोकॉ/ प्रशांत पगारे, पोकॉ/ कुणाल देवरे व पोकॉ/योगेश पाटील यांच्या पथकाने छापा टाकला असता आरोपी पत्त्यांचा खेळ खेळत पैसे टाकताना आढळून आले.
या कारवाईत शेख फारुख शेख नबी (५०), शेख शहीद शेख रफिक (४०), शेख निजाम शेख सिराज (५२), तस्लीम सुलेमान खान (५७), शेख हमीद शेख शौकत (४३), शेख हमीद शेख अमीर (४०) आणि शेख मुस्ताक खान अमीर खान (६०, सर्व रा. कासोदा) यांना अटक करण्यात आली. त्यांच्या अंगझडतीतून व ठिकाणावरून ३,३८० रुपये रोख, २२,००० रुपये किमतीचे मोबाईल आणि १,४०,००० रुपये किमतीच्या तीन मोटारसायकली असा एकूण १,६६,०३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पोकॉ/१७१८ समाधान तोंडे यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक सौ. कविता नेरकर-पवार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजय ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
