Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

कास्ट्राईब शिक्षक महासंघाचा मेळावा माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत संपन्न होणार .

0
0 0
Read Time5 Minute, 6 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचा शिक्षक मेळावा माजी खासदार व वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला असल्याची माहिती कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी दिली .
आमच्या प्रतिनिधीशी सविस्तरपणे बोलताना गौतम कांबळे म्हणाले की ,बुधवार दिनांक 31 मे 2023 रोजी सकाळी 10 वाजता श्रीकृष्ण गार्डन मंगल कार्यालय , केडगाव चौफुला ,सुपा रोड ,तालुका दौंड जिल्हा पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे .या शिक्षक मेळाव्याला माजी मंत्री व आमदार जितेंद्र आव्हाड ,शिवसेना नेत्या सुषमा अंधारे ,दौंडचे आमदार राहुल कुल ,दौंडचे माजी आमदार रमेश थोरात,वंचित बहुजन आघाडीचे नेते वसंतराव साळवे ,पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ .राजेश देशमुख , बार्टी पुणे चे विभाग प्रमुख (आयबीपीएस ) सत्येंद्रनाथ चव्हाण ,पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद ,भीमा पाटस साखर कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवनाना बारवकर ,दौंड पंचायत समितीचे माजी उपसभापती व कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्य सल्लागार विकास कदम ,कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे कायदेशीर सल्लागार अँड. अनिल कांबळे ,बहुजन लोक अभियानचे राज्य उपाध्यक्ष आबासाहेब वाघमारे ,वंचित बहुजन आघाडीचे दौंड तालुका नेते उत्तम गायकवाड ,वंचित बहुजन आघाडीचे दौंड तालुकाध्यक्ष अश्विन वाघमारे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत .

या शिक्षक मेळाव्याचे उद्घाटन माजी खासदार व वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे .कार्यक्रमाची अध्यक्षता कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे असणार आहेत .या शिक्षक मेळाव्यामध्ये राज्यभरातील पदाधिकारी व शिक्षक उपस्थित राहणार असून ‘कास्ट्राईब गुणवंत शिक्षक पुरस्कार ‘ देण्यात येणार आहेत .या कार्यक्रमात सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचाही सन्मान करण्यात येणार आहे .या शिक्षक मेळाव्याला कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्य पदाधिकारी ,24 जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष व त्यांचे सहकारी तसेच अनेक तालुकाध्यक्ष व त्यांचे सहकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती राज्य प्रवक्ते विनोद चव्हाण व राज्य महासचिव विठ्ठल सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली .
या मेळाव्यात विद्यार्थी ,पालक व शिक्षकांच्या अडीअडचणीवर चर्चा करण्यात येणार असून ते सोडवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे .या शिक्षक मेळाव्याला राज्यभरातील शिक्षक बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्य सल्लागार दिगंबर काळे व राज्य महिला संघटक पौर्णिमाताई रणपिसे यांनी केले आहे .
सकाळी 10 वाजता महाराष्ट्रातील प्रसिद्ध शाहीर राजेंद्र कांबळे खडूसकर यांच्या पोवाडाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती राज्य कोषाध्यक्ष दादासाहेब डाळिंबे व राज्य कार्याध्यक्ष चंद्रकांत सलवदे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली .

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: