Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

कोंबींग ऑपरेशन दरम्यान खुनाचा आरोप असलेल्या भोदुबाबासह 6 जुगारी,2 आरोपींना वॉरंट बजवत अटक,तर 20 मोटार वाहनांवर शहर पोलिसांची कारवाई.

0
1 0
Read Time5 Minute, 55 Second

संपादक गफ्फार शेख

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरात एक रात्र कोंबिंग ऑपरेशन अनेक कारवाईंचा धडाका सोबतच खुनाच्या आरोपीस अटक करुन जायखेडा पोलीस स्टेशनकडे हस्तांतरीत करण्यात आलेले आहे.या कोंबिंग ऑपरेशन मुळे शहरास पुन्हा शिस्त लागेल असे चित्र निर्माण झाले असून पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या कडून चाळीसगावकारांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक 19 एप्रिल 2023 रोजी रात्री 11 वाजता ते दिनांक 20 एप्रिल 2023 रोजीचे पहाटे 5 वाजे दरम्यान मा. पोलीस अधिक्षक सो. जळगांव यांच्या आदेशान्वये तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक, श्री रमेश चोपडे सो चाळीसगाव परिमंडळ व सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री अभयसिंह देशमुख सो. चाळीसगाव भाग यांचे मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत कोंबिंग ऑपरेशन व नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले होते.
पोलीस स्टेशन हद्दीत गस्त करीत असताना चाळीसगाव शहरातील दत्तवाडी परिसरात फॉरेस्ट विभागाच्या भिंती लगत एक संशयित इसम त्याचे स्वतःचे अस्तित्व लपवून गुन्हा करण्याच्या तयारीत असताना इसम नामे तुळशीराम बुधा सोनवणे वय 32 वर्ष रा. पिंपळकोठे ता. बागलाण जि. नाशिक मिळुन आल्याने त्याची पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्याकडे एक दोन फूट लांबीची लोखंडी सळई मिळून आल्याने त्याच्याविरुध्द चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122 प्रमाणे गुन्हा दाखल करुत त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने माहिती दिली कि, त्याचा दुरचा नातेवाईक प्रविण सोनवणे रा. पिंपळकोठे ता. बागलाण जि. नाशिक याचे त्याच्या बायकोशी अनैतिक संबंध होते. प्रविण सोनवणे हा नेहमी अघोरी विद्या शिकण्याचे बहाण्याने आरोपी तुळशीराम सोनवणे याचेकडे येत जात होता. तसेच आरोपी तुळशिराम यास प्रविण सोनवणे गुरु सुध्दा मानत होता. प्रविण सोनवणे याने तुळशिराम याच्या बायकोशी अनैतिक संबंध ठेवल्याने त्याचा राग मनात धरुन प्रविण सोनवणे यास राहते घरी बोलावुन त्याचे मित्राचे मदतीने गळफास देवुन प्रविण सोनवणे यास जिवे ठार मारले. तो मेल्याची खात्री झाल्यावर प्रविणचा मृतदेह घरीच सोडुन पळ काढला.
प्रविण सोनवणे हा घरी न आल्याने त्याचे नातेवाईकांनी जायखेडा पो.स्टे. जि. नाशिक येते तक्रार नोंदवली होती. पोलीसांनी प्रविणचा शोध घेत असतांना त्याचा मृतदेह तुळशिराम सोनवणे याच्या राहते घरात मिळुन आल्याने अकस्मात मृत्युची नोंद करुन तेथील पोलीस हे आरोपी तुळशीराम सोनवणेचा शोध घेत होते.
आरोपी तुळशीराम सोनवणे हा आलियाबाद गावात मांत्रीक म्हणुन प्रसिध्द असुन सदर आरोपी मिळुन आल्याचे सदर गुन्ह्याची उकल करणे चाळीसगांव शहर पोलीसांना शक्य झालेले आहे. सदर भोंदुबाबा तुळशीराम सोनवणे यास अटक करुन जायखेडा पोलीस स्टेशनकडे हस्तांतरीत करण्यात आलेले आहे. तसेच नमूद आरोपीचा अभिलेख चेक केला असता त्याच्यावर यापूर्वी जायखेडा पोलीस स्टेशन जि. नाशिक येथे भादवि कलम 326 वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
तसेच कोंबिंग ऑपरेशन दरम्यान एकूण दोन आरोपींना वॉरंट बजावत अटक करण्यात आली असून कोंबिंग ऑपरेशन दरम्यान जुगार खेळणाऱ्या सहा इसमांवर जुगार बंदी कायद्यान्वये मुंबई जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे.नाकाबंदी दरम्यान मोटर वाहन कायद्याखाली एकूण 20 वाहनावर कारवाई करण्यात येवुन, एकुण 14 हजार 500 रुपये दंड आकरण्यात आला आहे.

या कॉबिंग ऑपरेशन मध्ये पोलीस निरीक्षक संदीप पाटील तसेच गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड, पोना राहुल सोनवणे, भूषण पाटील, पोकॉ विजय पाटील, रवींद्र बच्चे, निलेश पाटील, अमोल भोसले, आशुतोष सोनवणे, समाधान पाटील, शरद पाटील यांचा सहभाग होता.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: