अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी पूर्वी जाहीरपणे सांगितले होते की, “मी माझ्या कुटुंबातील सदस्यांना राजकारणात आणणार नाही.” मात्र, तालुक्यातील जनता आणि कार्यकर्ते मात्र वेगळ्या नजरेने हा विषय पाहत आहेत. कारण, संपूर्ण तालुका “आपला परिवार” आहे, अशी भावना जोपासणारे आमदार मंगेश चव्हाण जर विकासाची धुरा सांभाळत असतील, तर त्यांच्या अनुपस्थितीत ती जबाबदारी त्यांच्या विश्वासू खांद्यावर म्हणजेच प्रतिभाताई चव्हाण यांच्या हातात द्यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे.
तालुक्यातील विकासकामांची गती, जनतेशी असलेला थेट संपर्क, वरिष्ठ नेत्यांशी असलेली जवळीक आणि मतदार संघात असलेल्या समस्या सोडविण्याची त्यांची धडपड – यामुळे आमदार चव्हाण यांची व्यस्तता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शहरातील समस्यांवर अधिक लक्ष देण्यासाठी त्यांना सहाय्यक नेतृत्वाची गरज असल्याचे दिसत आहे.पण सहाय्यक नेतृत्व विश्वासू हवा अचानक येऊन पैशांच्या जीवावर प्रसिद्धी मिळवत “राज” करणारा नको आणि असा विश्वासू सहकारी म्हणजे प्रतिभा ताई चव्हाण हे आहेत.

शिवनेरी फाउंडेशन च्या माध्यमातून प्रतिभाताई चव्हाण सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असून, त्यांनी लोकसहभागातून अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यामुळे त्या आमदार चव्हाण यांच्या विकासदृष्टीची सावली ठरत आहेत हे त्यांच्या कार्याला पाहून चाळीसगावकरांचे मत आहे.
आमदार चव्हाण यांनी दिलेला “शब्द” हा नैतिक बांधिलकीचा भाग असला तरी, कार्यकर्त्यांची भावना आणि शहराच्या विकासाची गरज यामुळे कार्यकर्ते “प्रतिभाताई चव्हाण या नगराध्यक्ष पदासाठी योग्य उमेदवार आहेत” अशी ठाम मागणी करत आहेत.
आता आमदार मंगेश चव्हाण यांचा परिवारातील सदस्य राजकारणात येणार नाही हा एक शब्द “कार्यकर्त्यांसाठी” होता आणि प्रतिभाताई चव्हाण यांनी “नगराध्यक्ष” व्हावे हा कार्यकर्त्यांचा निर्णय,आता एक शब्द महत्त्वाचा की शहराचे हित — या निर्णयातून नगराध्यक्षपदाची लढत आकार घेणार असून शब्दाच्या नावाने जरी राजकीय कुजबुज सुरू झाली असली तरी आमदार चव्हाण यांना एक भक्कम सात हवी आहे आणि ती फक्त आणि फक्त प्रतिभाताई चव्हाण यांच्या रूपाने पूर्ण होऊ शकते.
कार्यकर्त्यांच्या भावना समजून आमदार चव्हाण यांनी शहरहितासाठी निर्णय घेत अधिकृतपणे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी प्रतिभा ताईंच्या नावाची घोषणा करून कार्यकर्त्यांनी केलेल्या शहरहिताच्या मागणीची पूर्तता करावी.
