अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) – शहरातील अँग्लो उर्दू हायस्कूल येथे दिनांक ९ सप्टेंबर रोजी अलाउद्दीन शेख यांच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
साधारणपणे ५ सप्टेंबरला साजरा होणारा शिक्षक दिन यंदा ९ सप्टेंबर रोजी शाळेत विशेषरित्या साजरा करण्यात आला. या प्रसंगी शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुभाष पाटील, रफिक सर मणियार,बाडु चाचा, पत्रकार गफ्फार शेख (मलिक), पत्रकार तन्वीर शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात इकबाल सर, जाकीर सर, झहीर सर, आरिफ सर, अफसर सर, मुस्ताक सय्यद, मसरूर सर, फरीद सर, रफिक सर, मुबीन सर, अमजद सर यांचा मान्यवरांच्या हस्ते हार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुणे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुभाष पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “मी स्वतः एका शिक्षकाचा मुलगा आहे. गुरुजनांचा माझ्या हस्ते सत्कार करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी आयोजकांचा आभारी आहे.”
आयोजक अलाउद्दीन शेख यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “शिक्षकांचा सत्कार म्हणजे फक्त हार किंवा पुष्पगुच्छ देणे नसून त्यांना प्रेरणा देण्याचा हेतू यात आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणाऱ्या शिक्षकांविषयीचा हा आदर आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, “तालीम बेदारी मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांचे स्वागत, उच्च शिक्षणासाठी लोन मिळवून देण्याचे प्रयत्न, शैक्षणिक मदतीसाठी मान्यवरांकडून सहकार्य मिळवणे, पाटीपासून सुरू केलेला उपक्रम युनिफॉर्मपर्यंत पोहोचवणे अशा अनेक उपक्रमांतून शिक्षण व समाजविकासासाठी मी प्रयत्नशील आहे.”
कार्यक्रमाच्या शेवटी अफसर सर यांनी आयोजक व उपस्थित मान्यवरांचे शाळेतर्फे आभार मानले.
