अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) —राज्य शासनाने अतिवृष्टी व महापुरामुळे बाधित भागांसाठी जाहीर केलेल्या विशेष पॅकेजच्या शासन निर्णयात चाळीसगाव तालुक्याचा समावेश नसल्याचे समोर आले आहे. मात्र “शेतकरी बांधवांनो काळजी करू नका, चाळीसगाव तालुक्याचा समावेश निश्चित होईल” अशी ग्वाही आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली आहे.
आमदार चव्हाण म्हणाले की, “जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित असलेला चाळीसगाव तालुका आहे. त्यासंदर्भातील आवश्यक सर्व माहिती शासनाकडे सादर करण्यात आली आहे. मात्र शासन निर्णयात काही कारणास्तव तालुक्याचा समावेश राहिला आहे. याबाबत मी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीशभाऊ महाजन तसेच शासनाचे सचिव यांच्याशी बोललो असून शासन निर्णयात लवकरच दुरुस्ती करण्यात येईल.”
तसेच उद्या नाशिक दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचीही भेट घेऊन ही बाब त्यांच्याकडे मांडली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना दिलासा देत आमदार चव्हाण म्हणाले, “शेतकरी बांधवांनी अजिबात काळजी करू नये. शासन आणि मी स्वतः आपल्या सोबत आहे. शासन निर्णयाचे शुद्धीपत्रक काढून चाळीसगाव तालुक्याचा समावेश करूनच घेणार.”
या आश्वासनामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
