अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- नगरपालिकेत भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी नगरसेवक प्रशांत कुमावत यांची आज सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. भारतीय जनता पक्षाच्या सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला.
या बैठकीस आमदार मंगेश चव्हाण, लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. प्रतिभाताई चव्हाण तसेच भाजप शहराध्यक्ष नितीन पाटील उपस्थित होते. बैठकीदरम्यान नगरपालिकेतील विकासकामे, नागरिकांच्या समस्या आणि पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
निवडीनंतर आमदार मंगेशदा चव्हाण यांच्या हस्ते नवनिर्वाचित गटनेते प्रशांत कुमावत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार चव्हाण यांनी कुमावत यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देत,नगरपालिकेतील भाजप गट प्रभावीपणे नेतृत्व करेल, असा विश्वास व्यक्त केला.
गटनेतेपदी निवड झाल्यानंतर प्रशांत कुमावत यांनी पक्ष नेतृत्व व सर्व नगरसेवकांचे आभार मानत, चाळीसगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करण्याची ग्वाही दिली.
