चाळीसगाव शहर पोलीसांची अवैध रित्या दारू विक्री करणार्यांवर कडी नजर
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी गफ्फार शहा
चाळीसगाव(दि 1)-चाळीसगाव शहर पोलीसांची अवैध रित्या दारू विक्री करणार्यांवर कडी नजर अवैध दारू विक्रीवर दुसरी कारवाई ,चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील काडी कारखान्याजवळील अवैध दारू विक्रीचा अड्ड्यावर चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री विजयकुमार ठाकूरवाड यांचा मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मयूर भामरे, पोलीस नाईक भटू पाटील, पोलीस शिपाई रवी पाटील, अशोक मोरे, भूषण पाटील, मुकेश पाटील या पथकाच्या वतीने कारवाई करण्यात आली असून, त्यामध्ये आरोपी नामे संतोष उर्फ बापू जयराम चौधरी वय- 50 वर्षे, राहणार- चौधरी वाडा, चाळीसगाव हा त्याचे ताब्यात देशी टंगो संत्रा दारूच्या बाटल्या चोरट्या विक्रीसाठी बाळगून असल्याचे मिळून आल्याने रक्कम रुपये 2548/- ची देशी दारूच्या 49 टंगो पंच ब्रँडच्या बाटल्यांसह आरोपीला ताब्यात घेऊन चाळीसगाव शहर पो स्टे ला आणून आरोपिविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे,गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक भटू पाटील हे करीत आहेत.