अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) – प्रभाग क्रमांक ५ मधील सुवर्णाताई नगर येथे नाला ब्लॉक झाल्याने नागरिकांना येण्या-जाण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. या समस्येकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असताना, माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर चौधरी यांनी पुढाकार घेत नागरिकांच्या त्रासाची दखल घेतली.
चौधरी यांनी स्वखर्चातून नाल्यात नवीन पाईप टाकण्याचे काम हाती घेतले आणि लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांची गैरसोय दूर केली. त्यांच्या या कार्याचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.
नेहमीच “प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा न ठेवता आपण काही तरी करायला हवे, प्रभागातील नागरिकांना होणारी गैरसोय दूर करण्यासाठीच्या उद्देशानेच मी हा निर्णय घेतला,” असे प्रभाकर चौधरी यांनी सांगितले.
या कामामुळे पावसाळ्यात नाल्याचा पानी साचण्याचा प्रश्नही सुटण्याची शक्यता असून, स्थानिकांनी या कार्याची प्रशंसा करत त्यांचे आभार मानले आहेत.
