Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

छप्परबंद, शाह, फकीर समाजास विमुक्त जातीचे दाखले व वैधता प्रमाणपत्र मिळण्यास अडचणी येऊ नये आमदार फारूक शाह यांचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन

0
0 0
Read Time2 Minute, 41 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

धुळे-दि. २५-०५-२०२१ संपूर्ण महाराष्ट्रात छप्परबंद, शाह व फकीर समाजाला विमुक्त जातीचे दाखले व वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणींना तोंड द्यावे लागत होते. धुळे शहर मतदारसंघाचे आमदार फारूक शाह यांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचेकडे पत्र देवून समस्या मांडली. त्यानुसार सामाजिक न्याय मंत्री यांनी विमुक्त जातीचे दाखले व वैधता प्रमाणपत्र तत्काळ देणेबाबत आदेशित केले.
महाराष्ट्रात छप्परबंद, शाह व फकीर समाज लाखोंच्या संख्येने आहे. हा समाज अत्यंत गरीब असून आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे. त्यांचा मागासलेपणा दूर व्हावा व शैक्षणिक दृष्ट्या समाज सक्षम व्हावा या दृष्टीने शासनाने १९७८ साली विमुक्त जातींच्या यादीत १४ व्या क्रमांकावर छप्परबंद या जातीचा समावेश केलेला आहे. मात्र जातीचे दाखले आणि वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी छप्परबंद समाजाच्या नागरिकांची प्रचंड गैरसोय होत होती. विविध पुराव्यांची मागणी आणि अधिकाऱ्यांचा नाकर्तेपणा यामुळे दाखले मिळणे दूराप्रास्त झाले होते. याबाबत २०२० पासून सातत्याने सरकार दरबारी गाऱ्हाणे मांडण्याचे, पाठपुरावा करण्याचे काम आमदार फारूक शाह यांनी केले. मा.नामदार धनंजय मुंडे यांना याबाबत विदित करण्यात आले. त्यानुसार नामदार धनंजय मुंडे यांनी यापुढे छप्परबंद शाह व फकीर समाजाला तत्काळ जातीचे दाखले उपलब्ध करून द्यावेत आणि याबाबत येणाऱ्या सर्व अडचणी तत्काळ दूर कराव्यात असे आदेश पारित केले. यामुळे छप्परबंद, शाह व फकीर समाजाने आनंद व्यक्त केला असून आमदार फारूक शाह यांचे आभार मानले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: