अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव (प्रतिनिधी) – मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा आणि पवित्र सण ईद-ए-मिलाद उन नबी यावर्षी दि. ५ सप्टेंबर २०२५ (शुक्रवार) रोजी आहे. त्याच्यानंतरच्या दिवशी, म्हणजेच दि. ६ सप्टेंबर (शनिवार) रोजी गणेश विसर्जन मिरवणुका होणार आहेत. दोन्ही समाजाचे महत्वाचे उत्सव एकत्र आल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि प्रशासनावर सलग बंदोबस्ताचा ताण पडू नये, यासाठी मुस्लिम बांधवांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार, ईद-ए-मिलाद उन नबीचा जुलूस ५ सप्टेंबरऐवजी दि. ८ सप्टेंबर २०२५ (सोमवार) रोजी काढण्यात येणार आहे. हा निर्णय केवळ जळगावच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील सून्नी मुस्लिम समाजाने घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
यासंदर्भात मरकझ सून्नी जामा मस्जिद,भिलपुरा जळगाव येथे झालेल्या सभेत हा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यानंतर मरकझी जुलूस कमिटीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना अधिकृत निवेदन सादर करण्यात आले.
या प्रसंगी सून्नी जामा मस्जिद जळगाव, सून्नी ईदगाह ट्रस्ट जळगाव व मरकझी जुलुसे ईद-ए-मिलाद उन नबी कमिटीचे अध्यक्ष सै. अयाज अली नियाज अली, सय्यद जावेद, जावेद इमाम, सय्यद उमर, अमान बिलाल, शेख रईस, शेख शफी, अयान अलीम आदी मान्यवर उपस्थित होते.
