अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहर पोलीस गुन्हे शोध पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करून दोन अट्टल चोरट्यांना जेरबंद करत दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांची उकल केली आहे.
दि. २४ ऑगस्ट २०२५ रोजी हमाल वाडा, मारुती मंदिराजवळ शिवाजीनगर परिसरातून उदयकुमार सुभाष कोचुरे यांच्या ताब्यातील ३० हजार रुपयांची होंडा अॅक्टीव्हा ४ जी (क्र. एमपी ०४ एसवाय ७९५०) ही मोपेड चोरीस गेली होती. या प्रकरणी शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ३२१/२०२५ भा.न्या.स. कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने दोन टीम तयार करून तपास सुरू केला. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार संशयित इरफान खान उस्मान खान पठाण (वय २१, रा. साक्री, ह.मु. गेंदालाल मिल, जळगाव) यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने आपल्या साथीदार अदिल शेख उर्फ नाटया मजीद शेख(वय १९, रा. गेंदालाल मिल, जळगाव) याच्या मदतीने सदर अॅक्टीव्हा चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी चोरीस गेलेली अॅक्टीव्हा जप्त करून आरोपींना अटक केली.
दरम्यान, पोलिसांनी आरोपी इरफान खान याची कसून चौकशी केली असता, त्याने नोव्हेंबर २०२४ मध्ये साक्री पोलीस ठाणे हद्दीतून हिरो होंडा फॅशन प्रो (क्र. एमएच १९ बीबी ७८४१) ही मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. या प्रकरणी साक्री पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. ३९२/२०२४ भा.न्या.स. कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे.
अशा प्रकारे जळगाव शहर पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाने जळगाव शहरातील १ व साक्रीतील १ असा एकूण २ गुन्ह्यांची उकल केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे व पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत गुन्हे शोध पथकातील सफौ. सुनिल पाटील, पोहेकॉ. उमेश भांडारकर, सतिश पाटील, योगेश पाटील, नंदलाल पाटील, विरेंद्र शिंदे, दिपक शिरसाठ, भगवान पाटील, पोना. सुधीर साळवे, पोकॉ. अमोल ठाकुर, भगवान मोरे, प्रणय पवार व राहुलकुमार पांचाळ यांनी सहभाग घेतला.
