अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी)- शहरात पीपल्स सोशल फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव रॉयल्स व पीपल्स सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कळंत्री विद्यालय, जयहिंद माध्यमिक विद्यालय व साने गुरुजी विद्यालयातील तब्बल 200 गरजु विद्यार्थ्यांना शालेय दप्तर वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य मिलिंद बिल्दीकर यांनी भूषविले होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. नगरसेवक रामचंद्र जाधव, डॉ. संदीप देशमुख, मा. नगरसेवक सदाशिव गवळी, डॉ. विरजा देशमुख, डॉ. प्रियंका खेडेकर, अभिजीत खालणे, शारदा महाले, अजय काटे, भाऊसाहेब पाटील, वृषभ सुराणा व योगेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
फाउंडेशन गेल्या ११ वर्षांपासून शैक्षणिक, आरोग्यविषयक, महापुरुषांच्या सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम, अन्नदान, वृक्षारोपण, तसेच शासन दरबारी विविध सामाजिक विषयांवर निवेदनाद्वारे समाजहितासाठी कार्यरत आहे.
प्रास्ताविकात ॲड. आकाश पोळ यांनी विद्यार्थ्यांनी उत्तम शिक्षण घेऊन स्वतःचे व कुटुंबाचे नाव उज्ज्वल करावे असे मत व्यक्त केले. तर नगरसेवक रामचंद्र जाधव यांनी “विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेतल्यास उद्याचे अधिकारी तयार होतील” असे सांगितले. डॉ. संदीप देशमुख यांनी “विद्यार्थी देशाचे भवितव्य आहेत, त्यामुळे पालक व शिक्षकांनी त्यांच्या घडणीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे” असे प्रतिपादन केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य मिलिंद बिल्दीकर यांनी घेतलेला उपक्रम स्तुत्य असून भविष्यातही संस्था सामाजिक कार्यात अग्रेसर राहील असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हर्षल माळी, दीपक मोरे, मंगेश साळवे, शुभम महाजन, प्रणाल पवार, राकेश सरोदे, राकेश त्रिभुवन, साहिल आव्हाड, महेंद्र कुमावत, प्रवीण जाधव, खुशाल पाटील, श्रीकांत आव्हाड, पंजाब देशमुख, रमाकांत शिरसाठ, सनी रणधीर, राहुल पाटील, यशोदीप रणधीर, हर्षल देशमुख आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे आभार अनिकेत पोळ यांनी मानले तर सूत्रसंचालन शुभम महाजन यांनी केले.
