अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
कासोदा (ता.एरंडोल) – दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे कासोदा पोलिसांनी एका संशयित इसमाला तलवारीसह ताब्यात घेतले आहे.
प्रभारी अधिकारी निलेश राजपूत यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार, कासोदा शहरातील फरकांडे चौफुलीजवळ एक इसम हातात तलवार घेऊन संशयास्पद हालचाली करीत असल्याचे समजले. तत्काळ पोलीस अंमलदार नरेंद्र पाटील व सोनु पाचुंदे यांना घटनास्थळी रवाना करण्यात आले.
पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाल्यावर राघव रामा कुवर (रा. कोळबल्ली चेंबर, गलवाडा रोड, कासोदा) हा हातात तीन फूट लांब धारदार तलवार घेऊन नागरिकांमध्ये दहशत पसरवत असल्याचे निदर्शनास आले. त्याला तत्काळ ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणण्यात आले व त्याच्याविरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडून धारदार तलवार जप्त करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत सपोनि निलेश राजपूत, पोउनि धर्मराज पाटील, ग्रेड पोउनि रामकृष्ण पाटील, पोहेका नितीन सुर्यवंशी, पोहेका राकेश खोंडे, पोहेका श्रीकांत गायकवाड, पोका निलेश गायकवाड, पोका योगेश पाटील व पोका दिपक देसले यांनी सहभाग नोंदविला.
कासोदा पोलिसांच्या तात्काळ कारवाईमुळे संभाव्य अनर्थ टळला असून नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे.
