अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी)- भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्कांमध्ये शिक्षण हा एक महत्त्वाचा आणि सक्तीचा विषय आहे. मात्र वास्तवात अनेक मुले अजूनही शिक्षणापासून वंचित राहतात. याच पार्श्वभूमीवर जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून, जिल्हा परिषद शाळा डोणदिगर गावातील चार गरीब कुटुंबांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे संपूर्ण पालकत्व जलवा ग्रुपने स्वीकारले.
“शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही,” या विचारांना अनुसरून जलवा ग्रुप आणि सामाजिक कार्यकर्ते विनोद भाऊ साळुंखे यांनी हा उपक्रम हाती घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या “एक रुपया असेल तर अर्धा भाकरीवर आणि अर्धा पुस्तकांवर खर्च करा” या विचारातून प्रेरणा घेत, शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वर्षभराचा सर्व खर्च जलवा ग्रुपने उचलला.
या कार्यक्रमात आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे खान्देश अध्यक्ष विनोद भाऊ साळुंखे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय वह्या व पेन वाटप करण्यात आले. तसेच अंगणवाडी सेविकांना सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला डोणदिगर गावाचे माजी सरपंच साहेबराव बाबुलाल पाटील, प्रतिष्ठित नागरिक सीताराम पाटील, युवराज रामसिंग पाटील, तलाठी चकोर आप्पा, सरपंच खंडू मोरे, पोलिस पाटील अविनाश मोरे, तसेच मनिष पाटील, महेश महाराज, अजय पाटील, विशाल पाटील, राहुल मोरे, नितिन पाटील, निबा मोरे, जालिदर नाईक, संभाजी पाटील, इस्माईल सेक, विक्रम नाईक, खडू गायकवाड, प्रविण भालेराव, नामदेव जगताप, शुभम चौधरी, कमलेश पाटील, बापु पाटील, धीरज साळुंखे, तसेच शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते.
या उपक्रमामुळे जलवा ग्रुप आणि विनोद साळुंखे यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
