अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)– शहरातील दत्तवाडी येथील रहिवासी राणोजी आप्पा घुले यांचे नातू व राजेंद्र घुले यांचे चिरंजीव रोनक घुले यांनी नुकत्याच पार पडलेल्या बी.ए.एम.एस. परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवून शहराचा मान उंचावला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल रयत सेनेचे शहराध्यक्ष प्रदीप मराठे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
रोनक घुले यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवले असून लहानपणापासूनच त्यांचा अभ्यासाकडे कल राहिला आहे. शिक्षणासोबतच सामाजिक कार्यातही त्यांची रुची असल्याने भविष्यात डॉक्टर म्हणून गोरगरीब व गरजू रुग्णांच्या सेवेसाठी कार्य करण्याचा त्यांचा संकल्प आहे. त्यांच्या या जिद्दीला आणि चिकाटीला रयत सेनेच्या वतीने दाद देण्यात आली.
रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी डॉ. रोनक घुले यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देताना, “आजच्या काळात गुणवंत आणि सेवाभावी वृत्ती असणाऱ्या डॉक्टरांची गरज आहे. रोनक घुले यांनी आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावा,” असे आवाहन केले.
या सत्कार सोहळ्यात राणोजी आप्पा घुले, राजेंद्र घुले, रयत सेनेचे शहराध्यक्ष प्रदीप मराठे, तसेच रयत सेनेचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी रोनक घुले यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या यशाचा अभिमान व्यक्त केला.
