अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव(प्रतिनिधी)– जिल्ह्यात तसेच शहरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोहीम राबवत गेल्या महिन्यात तब्बल पाच वाहनं जप्त केली आहेत. डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.
स्थानीक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा, चाळीसगाव, जळगाव व पाचोरा उपविभागातील पथकांनी विविध ठिकाणी छापे घालून ४ ट्रॅक्टर व १ ट्रक असा एकूण ५ वाहनांवर कारवाई केली.
खालील प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे…
१६ जुलै २०२५ – चोपडा शहर पोलीस ठाणे हद्दीत अवैध वाळू भरलेला ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त करत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
२४ जुलै २०२५ – मेहुणबारे पोलीस ठाणे हद्दीत ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त; दंडात्मक कारवाईसाठी ताब्यात घेतला होता.
७ ऑगस्ट २०२५ – जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून गणपतीनगर परिसरात ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त करून तहसीलदारांना रिपोर्ट करण्यात आला होता.
८ ऑगस्ट २०२५- गुन्हे शाखेच्या जळगाव उपविभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी मानराज पार्क, राष्ट्रीय महामार्गावर टाटा कंपनीचा ट्रक (MH19 Z 2191) जप्त करत जिल्हाधिकारी कार्यालयात पुढील कारवाईसाठी जमा केले होते,
७ ऑगस्ट २०२५ – स्थानीक गुन्हे शाखेच्या पाचोरा उपविभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी भडगाव पोलीस ठाणे हद्दीत अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर व ट्रॉलीसहीत वाहतुक करणारा इसम मिळुन आला होता. त्यास नमुद ट्रॅक्टर व ट्रॉलीसहीत ताब्यात घेऊन मा. पोलीस निरीक्षक भडगाव पोलीस ठाणे यांना सदरचे ट्रॅक्टर व त्याच्या मालकावर दंडात्मक कारवाई करण्याकामी ताब्यात देण्यात आले आहे.
ही मोहीम अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक जळगाव, श्रीमती कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी चाळीसगाव यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा जळगाव, यांच्या अधिनस्त स्थानीक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने केली आहे.येत्या काळात ही कारवाई अधिक तीव्र करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
