अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- तालुक्यातील एका 10 वर्षीय अल्पवयीन बालकास फूस लावून पळवून नेल्याची घटना दिनांक 7 ऑगस्ट रोजी घडली होती.मुलगा परिसरात मिळून न आल्याने पालकांनी शोधाशोध सुरू केली मात्र मुलगा काही मिळाला नाही शेवटी हाताश झालेल्या पालकांनी ग्रामीण पोलिस ठाणे गाठत 8 ऑगस्ट रोजी अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल केला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या 10 तासात मुला सह आरोपीला ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
रामेश्वर कॉलनीतून फरार आरोपी कट्ट्यासह जेरबंद
गुन्हा नोंद होताच सदर गुन्हयाचे गांभिर्य ओळखुन चाळीसगाव ग्रामीण पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटिल यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना कळवुन, पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक श्रीमती कविता नेरकर, उप विभागिय पोलीस अधिकारी वियजकुमार ठाकुरवाड यांचे मार्गदर्शनाखाली तात्काळ दोन पोलीस पथक पो.उप नि. प्रदिप शेवाळे यांचे सोबत स.फौ. युवराज नाईक, पो.हवा. विजय शिंदे, पो.शि. श्रीराम कांगणे आणि पो.उप नि. कुणाल चव्हाण यांचे सोबत पो.हवा. संदिप पाटिल, पो.हवा. प्रविण सपकाळे, पो.हवा. नितीन सोनवणे, पो.शि. विजय पाटिल, पो.शि. किरण देवरे तयार केले. दोन्ही पथकांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवायला सुरुवात केली. एक पोलीस पथक सेंधवा, मध्य प्रदेश येथे रवाना झाले आणि दुसरे पोलीस पथक हे जळगाव जिल्हयातच तपासकामी रवाना झाले होते.
तपासा दरम्यान गोपनिय बातमिदारांकडुन मिळालेल्या माहिती आधारे बालकाला योगेश अनार शेमळ्या, वय २० वर्ष, रा. ह.मु. भोरस बु., ता. चाळीसगाव मुळ रा. जामन्या, ता. सेंधवा, जि. बडवाणी, मध्य प्रदेश हा पळवुन घेऊन गेले बाबत खात्री लायक माहिती प्राप्त झाली. त्या नंतर पोलीस पथकाने गोपनिय बातमीच्या आधारे नमुद आरोपीला अवघ्या 10 तासांत बालकासह मेहुणबारे पो.स्टे. हद्दीतुन चिंचगव्हाण फाटा येथुन ताब्यात घेतले. त्या नंतर बालकाकडे महिला पोलीसांनी त्याचे आई व वडिलांचे समक्ष विचारपुस केली असता, आरोपी योगेश अनार शेमळ्या याने बालका सोबत लैंगिक अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले.त्यामुळे बालकाचे जबाबा वरुन सदर गुन्हयात पोक्सो कायदयान्वये कलम वाढ करण्यात आली असुन, गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शशिकांत पाटिल यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप नि. प्रदिप शेवाळे हे करीत असुन, आरोपी योगेश अनार शेमळ्या याला अटक करण्यात आली आहे.
