अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव(प्रतिनिधी) – दिनांक 07 ऑगस्ट 2025 रोजी कोल्हे नगर परिसरात सरला सपकाळे यांच्या घरात सराईत गुन्हेगार दिपक लक्ष्मण तरटे (रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) याने गावठी कट्ट्यातून गोळीबार केला होता.या प्रकरणी सरला राजदीप सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट 3/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी दिपक तरटे हा फरार होता. यानंतर पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी तत्काळ शोध पथक तयार करत अधिकारी व अंमलदारांना रवाना केले. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पथकाने रामेश्वर कॉलनी परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. मा न्यायालयात हजर केल्यानंतर 10 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून, 09 ऑगस्ट रोजी त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला अंदाजे 15 हजार रुपये किंमतीचा सिल्वर रंगाचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे.
आरोपी दिपक तरटे याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार गंभीर गुन्हे दाखल असल्याचेही पोलीसांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या सूचनेनुसार पो.उ.नि. सचिन रणशेवरे, पो.हे.कॉ सुधाकर अंभारे, जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, सुशील चौधरी, पो.ना. मनोज सुरवाडे, विनोद सुर्यवंशी, योगेश बारी, रेवानंद साळुंखे व गोविंदा पाटील यांनी केली.
