अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव(प्रतिनिधी)- श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आदिवासी संस्कृतीची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आदिवासींची पारंपरिक वेशभूषा परिधान करून आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून केली. त्यांनी विद्यार्थ्यांना जागतिक आदिवासी दिनाचे महत्त्व आणि इतिहास याविषयी सविस्तर माहिती दिली. आदिवासी बांधवांचा आत्मसन्मान वाढविणाऱ्या वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन करिश्मा वंजारी यांनी केले. कार्यक्रमास शिक्षक निलेश पवार, अश्विनी शिंपी, शिल्पा कोंगे, अनिता सोनवणे, कल्याणी महाजन, पुष्पा मोरे, भाग्यश्री सुर्वे आणि नयना अडकमोल आदी उपस्थित होते.

