Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

जागतिक कर्करोग दिनानिमित्त आज 4 फेब्रुवारी 2020 रोजी एरंडोल तालुक्यातील ग्रामपंचायत गालापूर अंतर्गत आदिवासी वस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिल्ल वस्ती गालापुर या ठिकाणी माझी शाळा तंबाखू मुक्त शाळा उपक्रम सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले

0
1 0
Read Time3 Minute, 48 Second

एरंडोल(प्रतिनिधी):जागतिक कर्करोग दिनानिमित्त आज 4 फेब्रुवारी 2020 रोजी एरंडोल तालुक्यातील ग्रामपंचायत गालापूर अंतर्गत आदिवासी वस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिल्ल वस्ती गालापुर या ठिकाणी माझी शाळा तंबाखू मुक्त शाळा उपक्रम सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले तसेच सर्व विद्यार्थ्यांची मुख आरोग्य तपासणी सोबतच तंबाखू मुक्त जीवन जगण्याचा संकल्प आणि सलाम मुंबई फाउंडेशन अंतर्गत तंबाखूची प्रतिकात्मक होळी व शाळेच्या वतीने आदिवासी बांधवांनी मध्ये कर्करोगाविषयी जनजागृती शाळेचे उपक्रमशील राज्य शासन आदर्श शिक्षक राज्य शासन पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा मुख्याध्यापक किशोर पाटील कुंझरकर यांचे पुढाकारातून राबविण्यात आली.
यावेळी राज्यस्तरीय तंबाखू मुक्त शाळा मोहिमेविषयी व कर्करोगाविषयी किशोर पाटील कुंझरकर यांनी आपल्या मनोगतातून माहिती देताना व्यसनाविषयी चे दुष्परिणाम सांगितले. यावेळी सर्वांनी तंबाखू मुक्त जीवन जगण्याचा संकल्प केला.विद्यार्थ्यांचे मुख्आरोग्य तपासणी डॉक्टर संकेत पाटील यांनी केली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश भील,सुभाष दादा भी,ल, सुनील आप्पा भील, सहकारी शिक्षक राकेश माळी, रेखाताई भिल, सीमाताई सोनवणे, आदींनी परिश्रम घेतले.पुढे बोलताना शिक्षक संघटना राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक तथा शाळेचे मुख्याध्यापक किशोर पाटील कुंझरकर म्हणाले कीआज पासून समाजव्यवस्थेमध्ये व्यसनांपासून सर्वांना दूर करण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न चा संकल्प करूया जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने कर्करोग कुणालाही होता कामा नये यासाठी तंबाखूजन्य पदार्थ व इतर व्यसनांपासून सर्वांना दूर ठेवण्यासाठी सर्वांनी पुढे येऊया.केंद्र शासन राज्य शासन विविध स्वयंसेवी संस्था या संदर्भात सातत्याने पुढाकार घेत असून आपण ही चळवळ लोकचळवळ बनवूया.
या प्रेरणादायी उपक्रमाबद्दल एरंडोल तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विश्वास हरी पाटील, ग्रामपंचायतचे सरपंच आरिफदादा व सर्व सदस्य, ग्राम विकास अधिकारी आर एम पवार,शिक्षक संघटना राज्य समन्वय समितीचे राज्याध्यक्ष अर्जुनराव साळवे समता शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष अरुणराव जाधव, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बीजे पाटील सलाम मुंबई फाऊंडेशनचे अजय पिलंकर, आदींनी अभिनंदन केले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: