अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- चाळीसगाव शहर पोलिसांची मोठी कारवाई अवैधरित्या गांजा विक्री करणाऱ्या इसमाला वाहनासह ताब्यात घेत तब्बल 55 किलो गांजा व वाहन जप्त करण्यात आले आहे.
आरोपी अशोक भरतसिंग पाटील वय 54 वर्षे धंदा- ड्रायव्हर रा. प्लॉट नं.38, शिक्षक कॉलनी, चाळीसगांव हा चाळीसगांव शहरामध्ये अवैध रित्या गांजा विक्री करित असल्याबाबत माहीती मिळाल्याने मा. श्री. डॉ. महेश्वर रेड्डी सो. पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली, मा. अपर पोलीस अधिक्षक सो. श्रीमती कविता नेरकर (पवार) यांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे तसेच मा. सहा. पोलीस अधिक्षक सो. श्री अभयसिंह देशमुख यांची परवानगी घेवुन पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांनी जितेंद्र धनराळे, निवासी नायब तहसिलदार, चाळीसगांव,पोउनि सुहास आव्हाड, पोहेकॉ सुभाष घोडेस्वार, पोहेकॉ राहुल भिमराव सोनवणे, पोहेकॉ विनोद विठ्ठल भोई, पोना महेंद्र प्रकाश पाटील पोकॉ आशुतोष दिलीप सोनवणे, पोकॉ ज्ञानेश्वर हरी पाटोळे, पोकॉ पवन कृष्णा पाटील, पोकॉ विजय रमेश पाटील, पोकॉ ज्ञानेश्वर विलास गिते, पोकॉ मनोज मोरसिंग चव्हाण, पोकॉ राकेश मुरलीधर महाजन, पोकॉ रविंद्र निंबा बच्छे, म.पो.शि. स्नेहल मांडोळे, सर्व. नेम चाळीसगांव शहर पो.स्टेशन तसेच फोटोग्राफर अनिकेत जाधव, वजन माप करणारे प्रविण जगन्नाथ वाणी, रा. चाळीसगांव यांच्या पथकासह जागेवर जाऊन मिळालेल्या माहितीच्या आधारे सुमारे 10 लाख 6 हजार 300 रुपये किमतीच्या 50 किलो 315 ग्रँम गांजा व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकुण 22 लाख 6 हजार 300 रुपये किमतीचा मुद्देमालसह आरोपीसह ताब्यात घेत आरोपी विरुद्ध एन डी पी एस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक, सुहास आव्हाड व पोकॉ/उज्वलकुमार म्हस्के नेम. चाळीसगांव शहर पो.स्टे. हे करीत आहेत.
