संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरातून गहाळ झालेल्या तब्बल 12 मोबाईलांचा सायबर पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा जळगांव यांच्या सहकार्याने चाळीसगाव शहर पोलिसांनी शोध लावत मोबाईल मालकांना वरिष्ठांच्या हस्ते केले परत.
चाळीसगांव शहर पोलिस स्टेशन हद्दीतील मागील व चालु वर्षी आजपावेतो बरेच मोबाईल गहाळ बाबत संबंधीत मोबाईल धारक यांनी तक्रार दाखल केलेल्या होत्या. सदर तक्रारीबाबत डॉ. महेश्वर रेड्डी पोलिस अधिक्षक जळगांव,सौ. कविता नेरकर अप्पर पोलिस अधिक्षक चाळीसगांव,अभयसिंह देशमुख सहा. पोलिस अधिक्षक उपविभाग चाळीसगांव यांनी वेळोवेळी मासिक क्राईम मिटींग दरम्यान गहाळ मोबाईल हस्तगत करणे बाबत दिलेल्या सुचनावरुन मोबाईल धारकांनी पुरविलेल्या माहीतीच्या आधारे सायबर पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा जळगांव यांचे तांत्रिक विश्लेषण करिता मदत घेवुन चाळीसगांव शहर पोलिसांनी एकुण 12 मोबाईल अंदाजे किंमत 2 लाख 10 हजार किं.चे मोबाईल संच हस्तगत करुन ते मुळ मोबाईल धारकांना आज दिनांक 25 मे 2024 रोजी मा. सौ. कविता नेरकर अप्पर पोलीस अधिक्षक चाळीसगांव व मा.श्री अभयसिंह देशमुखं सो, सहा. पोलिस अधिक्षक उपविभाग चाळीसगांव यांचे हस्ते परत करण्यात आलेले आहेत.
सदरची कामगिरी मा. डॉ. महेश्वर रेड्डी सो, पोलिस अधिक्षक जळगांव, मा. सौ. कविता नेरकर अप्पर पोलीस अधिक्षक चाळीसगांव, मा. श्री अभयसिंह देशमुख सो, सहा. पोलिस अधिक्षक उपविभाग चाळीसगांव, यांचे मार्गदर्शनावरुन चाळीसगांव शहर पोलिस स्टेशनचे पोनि श्री संदीप भटु पाटील, पोकॉ शरद पाटील, पोकॉ नरेंद्र चौधरी, पोकॉ मनोज तडवी, पोना सचिन सोनवणे (सायबर पो.स्टे) पोना ईश्वर पाटील (स्था. गु. शाखा), पोकॉ गौरव पाटील (स्था. गु. शाखा) अश्यांनी केली आहे.
