दौंड तालुका आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या पदाधिकारी भगिनींनी आज आमदार राहुल कुल यांची भेट घेऊन त्यांच्या विविध मागण्याच्या संदर्भात निवेदन
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
दौंड शहर प्रतिनिधी पवन साळवे
दौंड तालुका आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या पदाधिकारी भगिनींनी आज आमदार राहुल कुल यांची भेट घेऊन त्यांच्या विविध मागण्याच्या संदर्भात निवेदन दिले. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आशा भगिनी स्थानिक पातळीवर प्रशासना बरोबर उत्तम काम करत आहेत. यापूर्वी आशा सेविकांना शासनाने संरक्षण देऊन त्यांच्या हाताला कायमस्वरूपी काम द्यावे अशी मागणी विधानसभेच्या मार्च २०२० च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती तसेच कोरोनाच्या काळात सर्वेक्षणाचे काम करीत असणाऱ्या आशा भगिनींना वाढीव मानधन व आरोग्य विमा कवच देण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार व ग्रामविकास मंत्री मा. हसन मुश्रीफ यांचेकडे पत्राद्वारे केली आहे. आज त्यांच्या विविध समस्या समजावून घेत आशा भगिनींच्या प्रलंबित मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन आमदार राहुल कुल यांनी दिले.