Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

दौंड तालुक्यात आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी दोन महिलांच्या “आत्महत्या”

0
3 0
Read Time2 Minute, 0 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

महिला प्रतिनिधी योगिता रसाळ
दौंड:आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो,मात्र याच दिवशी,दौंड तालुक्यामध्ये दोन महिलांनी आत्महत्या केल्याची खळबळ जनक घटना घडली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार (सालू- मालू)पारगाव येथील यमुना हनुमंत कारंडे या महिलेने सयाजी ताकवणे यांच्या शेतातील विहिरीत जीव दिला ,ही आत्महत्या आहे की अपघात याबाबत पोलिसांना विचारले असता त्यांनी सकृत दर्शनी ही घटना आत्महत्या असल्याचे म्हटले आहे.

याबाबत यवत पोलीस ठाण्यात मृताचे पती हनुमंत चंद्रकांत कारंडे (वय- 51 वर्ष ),व्यवसाय- नोकरी,राहणार -पारगाव तालुका- दौंड,जिल्हा-पुणे,यांनी दिली.

या दिवसाची दुसरी घटना सुर्जी, तालुका -दौंड ,जिल्हा- पुणे येथे घडली.पुनम बाळासो टेकवडे (वय- वर्ष 22) राहणार- कासुर्डी तालुका -दौंड,जिल्हा -पुणे.या महिलेने आपल्या राहत्या घरात लोखंडी अँगलला साडीने गळफास घेऊनआत्महत्या केली आहे.याबाबतची खबर लक्ष्मण बजाबा खेनट (वय वर्ष 52)व्यवसाय शेती,राहणार- कासुर्डी,तालुका- दौंड ,जिल्हा- पुणे,यांनी यवत पोलीस ठाण्यात दिली आहे.

वरील दोन्ही प्रकरणातील तपास यवत पोलीस स्टेशनचे निरीक्षक हेमंत शेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस करत आहेत.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
100 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: