Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

दौंड मध्ये सातव्या मजल्यावरून पडून तरुण युवकाचा मृत्यू

0
2 0
Read Time2 Minute, 30 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड(प्रतिनिधी)-दिं.15/02/2021 रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास निखिल सुनील बनसोडे वय 18 वर्ष रा. भिमनगर हा उमा रेसिडेन्सी शिवाजीनगर सहकार चौक येथे कृष्णा कंट्रक्शन येथे बिल्डिंगच्या बांधकामास पाणी मारण्यासाठी गेला असता खाली पडून तरुणाचा मृत्यू झाला

सदरची इमारत ही सात मजली असून काल दिनांक 15/ 2/ 2021 रोजी 11:30 वाजता सेवक सोनवने यांना विजय गंगाराम सस्ते यांचा फोन आला व त्यांनी सांगितले की निखिल बनसोडे हा कामावरती पाणी मारत असताना खाली पडला असून त्यास मार लागल्याने आम्ही प्रथम डॉक्टर बजरंग काळे यांचे हॉस्पिटल येथे नेले होते व तेथे त्यांनी सांगितले की आमच्याकडे सुविधा उपलब्ध नसल्याने त्यास तुम्ही पिरॅमिड हॉस्पिटल येथे घेऊन जा त्यानंतर आम्ही त्याच पिरॅमिड हॉस्पिटल येथे आणले असता तेथील डॉक्टरांनी त्यास तपासून तो मयत झाल्याचे सांगितले त्यानंतर तेथील डॉक्टरांनी त्यास सरकारी हॉस्पिटल येथे घेऊन जाण्यास सांगितले आम्ही त्याला सरकारी हॉस्पिटल दौंड या ठिकाणी घेऊन जात आहे तुम्ही तेथे या असे फोन द्वारे कळविले त्यानंतर सेवक सोनवने लगेच सरकारी हॉस्पिटल दौंड या ठिकाणी गेले असता त्यांचे साडू सुनील बनसोडे यांचा मुलगा निखिल सुनिल बनसोडे याला सरकारी हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी तपासून पाहिले असता तो मयत झाल्याचे सांगितले अशी माहिती दौंड पोलीस स्टेशन मार्फत समजली असून . पुढील तपास पो.निरीक्षक श्री. नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.वाघमारे साहेब पो.स.ई.करत आहेत.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
33 %
Excited
Excited
33 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
33 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: