दौंड येथे अन्य भागातील कामासाठी आलेल्या मजुरांना जेवणाची व्यवस्था
दौंड(पवन साळवे)कोरोनाच्या थैमानाने संपूर्ण जग हादरून गेले आहे.त्याच्यातच भारतात आणि महाराष्ट्रातही रुग्णांची संख्या वाढत आहे.आणि परराज्यातील मजूर महाराष्ट्रात कामासंदर्भात आले असता ते इथेच अडकलेले आहेत त्यांच्या त्यांच्या खाण्याची आणि राहण्याची व्यवस्था देखील काही स्वयंसेवी संस्था करत आहेत.त्यातीलच दौंड नगरपरिषद दौंडच्या कर्मचाऱ्यांनीही मदतीचा हात म्हणून दौंड स्टेशनवरील काही परराज्यातील प्रवाशांना व अन्य भागातील कामासाठी आलेल्या मजुरांना जेवणाची व्यवस्था करून दिले.पापा सोलंकी,सिद्धांत बोराडे,साजन वाल्मिकी, सचिन बोराडे,सागर मोरे, जगन्नाथ चव्हाण, सुनील यादव,जितेंद्र गहलोत, राजू बोराडे,लक्ष्मण खंडाळे, सोनू पुजारी,आरिफ शेख,आदी कर्मचारी वर्ग व मित्र परिवाराने सहकार्य केले.