दौंड(प्रतिनिधी):-दौंड शहरात चोरांनी धुमाकूळ माजवला आहे दौंड शहरातील गजानन सोसायटी, पानसरे वस्ती, खाटीक गल्ली,सिद्धार्थ नगर, वडार गल्ली,गांधी चौक,या ठिकाणावरील वस्त्यांना केंद्रित करण्यात आले आहे पोलीस प्रशासनासमोर खूप मोठे अहवान आहे चोरी करणारी टोळीचा पेहराव,हाप पॅन्ट, बरमुडा, व हातामध्ये कोयता तलवारी घेऊन घरांना केंद्रित करत आहे या वस्तीमधील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.रात्र भर वस्तीमधील लोक गस्त घालत आहे रात्री 10 च्या सुमारास काही घरांना कुलूप आहे अश्याच घरांना केंद्रित करत आहे लवकरात लवकर या चोरट्याना पकडण्यात यावे येथील नागरिकांची मागणी होत आहे.

